Karnataka Assembly Election 2023 esakal
देश

Assembly Election : बंडखोर आमदारांच्या संपत्तीत मोठी वाढ; पत्नीच्या नावावरही दाखवली संपत्ती!

बंडखोर आमदारांच्या स्थावर मालमत्तेत आणि वारसांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

११ बंडखोर आमदारांच्या स्थावर मालमत्तेत आणि वारसांमध्ये मोठी वाढ झाली असून, बहुतांश नेत्यांनी या मालमत्ता आपल्या पत्नींच्या नावावर नोंदवल्या आहेत, अशी माहिती समोर येत आहे.

Karnataka Assembly Election 2023 : २०१९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार उलथून काँग्रेस (Congress) आणि धजदमधून (JDS) भाजपमध्ये (BJP) उडी घेऊनतल्यानंतर मंत्रिमंडळात सामील झालेल्या ‘त्या’ ११ बंडखोर आमदारांच्या संपत्तीत मोठी वाढ झाल्याचे आढळून आले आहे.

११ बंडखोर आमदारांच्या स्थावर मालमत्तेत आणि वारसांमध्ये मोठी वाढ झाली असून, बहुतांश नेत्यांनी या मालमत्ता आपल्या पत्नींच्या नावावर नोंदवल्या आहेत, अशी माहिती समोर येत आहे.

आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी २०१८ मध्ये निवडणूक लढवली तेव्हा त्यांची जंगम मालमत्ता १.११ कोटी रुपये होती, ती आता २.७९ कोटी रुपये आहे. त्याचप्रमाणे त्यांची स्थावर मालमत्ता जी ५२ लाख ८१ हजार रुपये होती, ती आता एक कोटी ६६ लाख ६० हजार ४८० झाली आहे. २०१८ मध्ये सुधाकरच्या पत्नीची स्थावर मालमत्ता एक कोटी १७ लाख ६३ हजार ८७१ रुपये होती. आता ते केवळ पाच वर्षांत १६ कोटी १० लाख चार हजार ९६१ रुपये झाले आहे.

२०१८ मध्ये १८ लाख ९३ हजार २१७ रुपये असलेली महेश कुमठळ्ळी यांची मालमत्ता आता एक कोटी ३३ लाख ३२ हजार ८१९ रुपये झाली आहे, तर सहकार मंत्री एस. टी. सोमशेखर यांची संपत्ती जी २०१८ मध्ये ६७.८३ लाख रुपये होती, ती आता ५.४६ कोटी रुपये झाली आहे. यापूर्वी पत्नीची संपत्ती जाहीर न केलेल्या अनेक नेत्यांनी यावेळच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना शपथपत्र सादर केले आहे.

त्यापैकी एक बी. ए. बसवराजू यांनी घोषित केले आहे, की त्यांच्या पत्नीकडे ५६.५७ लाख जंगम मालमत्ता आणि २१.५७ कोटी स्थावर मालमत्ता आहे. २०१८ मध्ये ३.१२ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता असलेले कृषिमंत्री बी. सी. पाटील यांच्याकडे आता २०२३ मध्ये १९.६० कोटी रुपयांचे व्यावसायिक संकुल आणि घर आहे.

कॅबिनेट मंत्री बनल्याने वाढ

कॅबिनेट श्रेणीचा दर्जा आणि पगारवाढ यामुळे मालमत्तेत वाढ झाल्याचे नेत्यांनी सांगितले आहे. एवढ्या प्रमाणात मालमत्तेत वाढ झाल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pak Rapper Indian Flag : पाक रॅपरने शो मध्ये फडकवला 'तिरंगा'! पाकिस्तानात संतापाची लाट, व्हिडिओ व्हायरल, काय घडलं नेमकं?

WPL 2026 Date: मोठी बातमी! महिला प्रीमियर लीग २०२६ कधीपासून सुरू होणार? तारीख आली समोर

नॅशनल क्रश झाल्यानंतर दोन दिवसात गिरीजा ओकचे किती फॉलोवर्स वाढले? आकडा वाचून भुवया उंचावतील

१० वी पास...१० वर्षांचा प्रिटिंगचा अनुभव...YouTube बघून तयार केल्या बनावट नोटा अन्...; पठ्ठ्याची करामत वाचून व्हाल थक्क

Mumbai News: मुंबईला जागतिक दर्जाचे टनेल मत्स्यालय मिळणार! कुठे अन् कधी पूर्ण होणार? बीएमसीने संपूर्ण योजना सांगितली

SCROLL FOR NEXT