Congress Sakal
देश

Karnataka Election : काँग्रेसकडून उमेदवारांची चौथी यादी जाहीर; माजी मुख्यमंत्री शेट्टर हुबळी-धारवाडमधून लढणार

10 मे रोजी होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं 7 उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली.

Balkrishna Madhale

निवडणुकीची तारीख जाहीर होण्यापूर्वी सिद्धरामय्या यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली होती.

Karnataka Assembly Election 2023 : 10 मे रोजी होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं 7 उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. मंगळवारी रात्री उशिरा काँग्रेसनं ही यादी जाहीर केली.

भाजपमधून काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर (Jagdish Shettar) यांना हुबळी-धारवाड मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

याआधी शनिवारी काँग्रेसनं (Congress) आपल्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली होती. या यादीत काँग्रेसनं आपल्या 43 उमेदवारांची नावं समाविष्ट केली होती. विशेष बाब म्हणजे, यादीत कोलार मतदारसंघातून पक्षानं कोथूर मंजुनाथ यांना तिकीट दिलंय. या जागेवरुन सिद्धरामय्या निवडणूक लढवणार होते.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) हे त्यांच्या सुरक्षित सीट वरुणाशिवाय कोलारमधून निवडणूक लढवण्यासाठी जानेवारीपासून तिकीटाची मागणी करत होते. मात्र, पक्षानं ते मान्य केलं नाही. डीके शिवकुमार आणि जी परमेश्वरांसह अनेक काँग्रेस नेत्यांनी सिद्धरामय्या यांना दुसर्‍या मतदारसंघातून तिकीट देण्यास विरोध केला.

इतकंच नाही तर निवडणुकीची तारीख जाहीर होण्यापूर्वी सिद्धरामय्या यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली होती, तेव्हा त्यांना कोलारऐवजी केवळ वरूणा जागेवरूनच निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला होता. दोन मतदारसंघातून एक उमेदवार उभं करण्याऐवजी इतर नेत्यांनाही निवडणुकीत संधी द्यावी, असं पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचं म्हणणे होतं.

काँग्रेसनं माजी मंत्री आणि अभिनेता ते राजकारणी उमाश्री यांना तेरदळ आणि सिध्दू यांना कन्नूरमधून तिकीट दिलंय. काँग्रेसनं पहिल्या आणि दुसऱ्या यादीत 166 उमेदवार जाहीर केले होते आणि 58 नावं प्रलंबित ठेवली होती, त्यापैकी 43 उमेदवारांची नावं शनिवारी तिसऱ्या यादीत जाहीर करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत सेनाभवनासमोर राडा! शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात, आदित्य-तेजस ठाकरे आक्रमक

IND vs WI, 3rd T20I: भारतीय संघात दोन मोठे बदल; वैभव सूर्यवंशीला मिळली संधी? जाणून घ्या Playing XI

Delhi Police Detention Row : "या पोलिसांच्या बसेस आहेत की छळ छावण्या?"; आंदोलक नेहा बोराचा बसमधून व्हिडिओ शेअर करत थेट सवाल!

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Electric Shock: जमिनीपासून अवघ्या ४ फुटांवर वीजवाहिनी; विजेचा धक्का लागून दोन म्हशींचा मृत्यू; प्रसंगावधान राखल्याने तीन म्हशी वाचल्या

SCROLL FOR NEXT