Congress Leader DK Shivkumar esakal
देश

Karnataka Election : कर्नाटकात काँग्रेस-जेडीएस युती होणार? युतीबाबत डीकेंचं मोठं वक्तव्य

भाजपला (BJP) सत्तेबाहेर ठेवण्यासाठी ‘जेडीएस’ आणि काँग्रेसने हातमिळवणी केली होती.

सकाळ डिजिटल टीम

बंगळूर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka Assembly Election) धर्मनिरपेक्ष जनता दलाबरोबर (जेडीएस) काँग्रेस मतदानोत्तर युती करणार नाही, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांनी बुधवारी स्पष्ट केले. काल विधानसभेसाठी मतदान झाले. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना शिवकुमार यांनी ‘काँग्रेस-जेडीएस’च्या युतीची शक्यता फेटाळून लावली.

राज्यात २०१८ मध्ये काँग्रेसला ७८ तर ‘जेडीएस’ला ३७ जागा (Congress-JDS Alliance) मिळाल्या होत्या तर भाजप १०४ जागांसह सर्वांत मोठा पक्ष ठरला होता. भाजपला (BJP) सत्तेबाहेर ठेवण्यासाठी ‘जेडीएस’ आणि काँग्रेसने हातमिळवणी केली होती. या दोन्ही पक्षाचे आघाडी सरकार कर्नाटकमध्ये सत्तेवर आले होते. पण, नंतर बंडखोर आमदारांनी भाजपबरोबर घरोबा केल्याने ‘काँग्रेस-जेडीएस’चे सरकार कोसळले होते.

हा धागा पकडून शिवकुमार यांनी यावेळच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांची मतदानोत्तर युती होणार नाही, असे सांगत काँग्रेस स्वबळावर सरकार स्थापन करेल, असा दावा शिवकुमार यांनी केला. सिद्धरामय्या यांच्या काँग्रेसला १३० ते १५० जागा मिळतील, या दाव्याला आणि पक्ष निसटते बहुमत मिळेल, या निष्कर्षालाही त्यांनी दुजोरा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT