Karnataka Election 2023 esakal
देश

मोठी बातमी! निवडणूक प्रचारसभेला जात असताना माजी मुख्यमंत्री कारमधून खाली कोसळले

कर्नाटकात विधानसभा निवडणुकीसाठी 10 मे रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे, तर 13 मे रोजी निकाल लागणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

बूट घसरल्यामुळं तोल जाऊन ते पडल्याचं सांगितलं जात आहे. विजयनगर (Vijayanagar) जिल्ह्यातील कोडलगी विधानसभा मतदारसंघात आयोजित जाहीर मेळाव्यात सहभागी होण्यासाठी ते आले होते.

Karnataka Election 2023 : कर्नाटकात राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. कर्नाटकात विधानसभा निवडणुकीसाठी 10 मे रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे, तर 13 मे रोजी निकाल लागणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी प्रचारात जोर वाढवला आहे.

दरम्यान, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते सिद्धरामय्या (Siddaramaiah) कारमध्ये उभं राहून कार्यकर्त्यांना हात उंचावताना तोल जावून खाली पडल्याची घटना आज (शनिवार) घडली. या घटनेनंतर त्यांना कारमध्ये बसवण्यात आलं. त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.

बूट घसरल्यामुळं तोल जाऊन ते पडल्याचं सांगितलं जात आहे. विजयनगर (Vijayanagar) जिल्ह्यातील कोडलगी विधानसभा मतदारसंघात आयोजित जाहीर मेळाव्यात सहभागी होण्यासाठी ते आले होते. यावेळी सिध्दरामय्यांनी कारच्या दरवाज्यात उभं राहून कार्यकर्त्यांना हात उंचावत होते. यावेळी अचानकपणे त्यांच्या चेहऱ्यावर थकवा, अस्वस्थता जाणवली. ते बघता खाली कोसळू लागले.

Karnataka Election 2023

दरम्यान, दरवाज्याला धरून ते खाली पडत होते. याचवेळी त्यांच्या पाठीमागे उभे असलेले अंगरक्षकांनी व कार्यकर्त्यांनी त्यांना सावरलं. विधानसभा निवडणुकीसाठी सिध्दरामय्यांचा बळारी, विजयनगर, रायचूर, दावनगिरीसह विविध ठिकाणी प्रचार दौरा झाला. आज सकाळी सिंधनूर येथून हेलिकॉप्टरनं कोडलगी इथं आले. यावेळी ते कारमधील खिडकीचा दरवाजा उघडून उभं राहून चाहत्यांना व कार्यकर्त्यांना हात उंचावताना खाली पडले. त्यांना कोणतीही दुखापत झाली नाहीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT