Karnataka Election 2023 esakal
देश

Karnataka Election : भाजपनंतर आता काँग्रेसमध्ये बंडखोरी; तिकीट न मिळाल्यानं माजी खासदाराचा राजीनामा

भाजप (BJP) आणि काँग्रेसनं कर्नाटकमधील त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

Balkrishna Madhale

भारतीय जनता पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रहितासाठी काम करत आहे. मीही भाजपमध्ये प्रवेश करण्याचा विचार करत आहे.

Karnataka Election 2023 : भाजप (BJP) आणि काँग्रेसनं कर्नाटकमधील त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र, तिकीट न मिळालेल्या उमेदवारांनी पक्षाविरोधात बंडखोरी सुरू केली आहे.

यापूर्वी हा बंडखोरी सूर भारतीय जनता पक्षात दिसत होता. आता काँग्रेसमध्येही अशीच स्थिती पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे (Congress) माजी खासदार बीव्ही नायक (BV Nayak) यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.

त्यांना देवदुर्ग विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्यास पक्षानं नकार दिला. बीव्ही नायक यांच्या जागी त्यांच्या भावाच्या पत्नीला तिकीट देण्यात आलंय, त्यामुळं नायक यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला.

राजीनामा दिल्यानंतर नायक म्हणाले, पक्षानं माझ्याकडं वारंवार दुर्लक्ष केलं. सध्या पक्षांतर्गत गटबाजी सुरू आहे. भारतीय जनता पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रहितासाठी काम करत आहे. मीही भाजपमध्ये प्रवेश करण्याचा विचार करत आहे. त्यांनी मला मानवी मतदारसंघातून विधानसभेचं तिकीट देण्याचं आश्वासन दिलंय.

याआधी मी काँग्रेसचा माजी खासदार होतो. आता बीसीसी अध्यक्ष म्हणून काम करत आहे. मी तीन मतदारसंघातून तिकिटासाठी अर्ज केला होता. काँग्रेस पक्षात माझे वडील 4 वेळा आमदार होते, मी एकेकाळचा खासदार होतो. पक्षाच्या सेवेत माझ्या कुटुंबाचं मोठं योगदान आहे. मात्र, पक्षानं माझ्याकडं वारंवार दुर्लक्ष केलं, असंही नायक यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT