Congress Sakal
देश

Karnataka Election : काँग्रेसची दुसरी यादी जाहीर; 3 भाजप, एक JDS बंडखोरांसह 42 उमेदवारांना दिलं तिकीट

कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षानं (Congress Party) आज उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केलीये.

Balkrishna Madhale

2018 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 104, काँग्रेसला 78 आणि जेडीएसला 37 जागा मिळाल्या होत्या.

Karnataka Election 2023 : कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षानं (Congress Party) आज उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केलीये. या यादीत 42 उमेदवारांना तिकीट देण्यात आलंय.

विशेष म्हणजे, काँग्रेसनं भाजप (BJP) आणि जेडीएस (JDS) सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या 3 जणांना तिकीट दिलंय.

या यादीत भाजप सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी आमदार गोपालकृष्ण, बाबुराव चिंचनसूर आणि भाजपमधून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या आणखी एका आमदाराला तिकीट देण्यात आलंय. यासोबतच जेडीएस सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी आमदार श्रीनिवास यांना गुब्बीमधून रिंगणात उतरवण्यात आलंय.

कर्नाटक निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 10 मे रोजी मतदान होणार असून 13 मे रोजी निकाल लागणार आहे. काँग्रेसनं या निवडणुकीसाठी आतापर्यंत 164 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. आज आणखी 42 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत.

पक्षानं दुसऱ्या यादीत निपाणी मतदार संघातून माजी आमदार काकासाहेब पाटील यांना पुन्हा संधी दिली आहे. दरम्यान, 2018 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 104, काँग्रेसला 78 आणि जेडीएसला 37 जागा मिळाल्या होत्या. कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही. 23 मे रोजी येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस-जेडीएस आघाडीचं सरकार स्थापन झालं. 14 महिन्यांनंतर काँग्रेस आणि जेडीएसच्या काही आमदारांच्या बंडानंतर कुमारस्वामींना खुर्ची सोडावी लागली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JP Nadda: आरक्षण हटाओ आंदोलन! शिष्टमंडळाने घेतली जेपी नड्डांची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

Marathi News Live Updates : पुण्यात प्रेशर मिड आणि प्लाझ्मा वर बंदी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा सुरू

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

Marathi Language Rule: ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Car Care Tips: कारमध्ये फोन चार्ज करताय? 'या' ४ चुकांमुळे मोबाईलचा ब्लास्ट अन् कारची बॅटरी होऊ शकते डेड!

SCROLL FOR NEXT