Karnataka Assembly Election 2023 esakal
देश

Karnataka Election : अण्णा हजारेंकडून घेतली प्रेरणा; पदाचा राजीनामा देत न्यायाधीश उतरले थेट रिंगणात

राठोड (Subhashchandra Rathod) यांनी आपल्या सात वर्षाच्या न्यायालयीन सेवेचा राजीनामा देत धजदमध्ये प्रवेश केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Karnataka Assembly Election 2023 : मूळचे विजापूर जिल्ह्याच्या बसवण बागेवाडी (Basavan Bagewadi) तालुक्यातील संकदाळ गावचे असलेले सुभाषचंद्र राठोड (Subhashchandra Rathod) यांनी आपल्या सात वर्षाच्या न्यायालयीन सेवेचा राजीनामा देत धजदमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनालाही नवी कलाटणी मिळाली आहे.

गुलबर्गा (Gulbarga) जिल्ह्यातील चित्तापूर राखीव विधानसभा मतदारसंघ (Chittapur Assembly Constituency) त्यांनी निवडणुकीसाठी निवडला आहे. समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare), एस. आर. हिरेमठ, लोकायुक्त संतोष हेगडे यांच्यापासून प्रेरणा घेतलेले राठोड यांनी कायद्याचे शिक्षण घेत असतानाच ‘भ्रष्टाचारमुक्त आपला समाज’ ही संघटना स्थापन करीत भ्रष्टाचाराविरोधात लढा उभारला होता.

सहा मुलांपैकी चार मुलांनी मिळवली कायद्याची पदवी

संकदाळ गावचे असलेले राठोड गरीब परिस्थितीतून वर आलेले आहेत. त्यांचे कुटुंब स्थलांतरित कामगाराचे कुटुंब होते. नंतर त्यांच्या वडिलांनी परिवहन विभागात चालक म्हणून सेवा बजाविली. सहा मुले असल्याने अनेक वेळा पोटापाण्याचा प्रश्नही निर्माण झाला, पण वडिलांनी मुलांच्या शिक्षणात कोणतीही कमतरता शिल्लक ठेवली नाही. सहा मुलांपैकी चार मुलांनी कायद्याची पदवी मिळविली असून वकील आणि न्यायाधीश म्हणून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Karnataka Assembly Election 2023

राठोड न्यायाधीश परीक्षा उत्तीर्ण

सुभाषचंद्र राठोड यांचे थोरले बंधू अनिल कुमार हे उच्च न्यायालयाच्या गुलबर्गा खंडपीठात न्यायाधीश आहेत. त्यांचे बंधू कुमार हे विजापूर तर सुनील हे बसवन बागेवाडी न्यायालयात न्यायाधीश आहेत. तर चौथे सुभाषचंद्र हे चित्तापूर न्यायालयात न्यायाधीश होते.त्यांचे अन्य दोघे बंधू शेती करतात. तर आई कमलाबाई या संकदाळ ग्रामपंचायतीच्या सदस्या आहेत. कायद्याची पदवी मिळविल्यानंतर राठोड यांनी २०१६ मध्ये वकिली सुरु केली. ते करत असतानाच त्यांनी सिव्हिल कनिष्ठ श्रेणी न्यायाधीश परीक्षा उत्तीर्ण केली.

न्यायाधीश पदाचा राजीनामा

चित्तापूर न्यायालयात त्यांनी चार वर्ष सिव्हिल न्यायाधीश म्हणून सेवा बजाविल्यानंतर विजापूर, गदग येथील न्यायालयात न्यायाधीश पदावर काम केले. गदग येथून त्यांनी न्यायाधीश पदाचा राजीनामा दिला असून आपल्या सात वर्षाच्या कार्यकाळापैकी चार वर्ष सेवा बजाविलेल्या चित्तापूरमधूनच ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT