Karnataka Assembly Election 2023 esakal
देश

Karnataka Election : कर्नाटक निवडणूकीत काँग्रेसचे उमेदवार सर्वाधिक कलंकित, तर श्रीमंतीमध्ये…

रोहित कणसे

Karnataka Election 2023 : कर्नाटकात 10 मे रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी राजकीय पक्षांनी पूर्ण तयारी केली असून युद्धपातळीवर प्रचार सुरू आहे. दरम्यान, राजकारण्यांची माहिती देणारी संस्था ADR ने सर्व उमेदवारांबाबत अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार या निवडणूकीत यावेळी काँग्रेसने सर्वाधिक कलंकित आणि करोडपती उमेदवार उभे केले आहेत.

निवडणुकीसाठी एकूण 2,615 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यापैकी 2,586 उमेदवारांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांचे मूल्यमापन ADR ने केले आहे. त्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यानुसार 2,586 उमेदवारांपैकी 581 म्हणजेच 22 टक्के उमेदवारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. त्यातही 404 उमेदवारांवर गंभीर आरोप झाले आहेत.

निवडणूक लढवणाऱ्या 1,087 पैकी 42 उमेदवारांकडे एक कोटी किंवा त्याहून अधिक संपत्ती आहे. उमेदवारांची सरासरी मालमत्ता 12.56 कोटी रुपये आहे.

तसेच या रिपोर्टनुसार काँग्रेसच्या 221 उमेदवारांचे विश्लेषण करण्यात आले. त्यापैकी 122 म्हणजे 55 टक्के उमेदवार असे आहेत ज्यांच्यावर फौजदारी खटले प्रलंबित आहेत.

या बाबतीत भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे. भाजपच्या 224 उमेदवारांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण करण्यात आले. त्यापैकी 96 म्हणजेच 43 टक्के कलंकित आहेत. JDS चे 34 टक्के, AAP चे 23 टक्के, NCP चे 22 टक्के, CPM चे 33 टक्के उमेदवार कलंकित आहेत.

श्रीमंतांना तिकीट देण्यात काँग्रेस आघाडीवर

निवडणूक लढवणाऱ्या 42 टक्के उमेदवारांकडे एक कोटी किंवा त्याहून अधिक संपत्ती आहे. करोडपतींना तिकीट देण्यातही काँग्रेस पुढे आहे. काँग्रेसचे 97 टक्के उमेदवार कोट्यधीश आहेत. 96 टक्के भाजप, 82 टक्के JDS, 51 टक्के आम आदमी पार्टी, 56 टक्के NCP, 33 टक्के CPM उमेदवारांकडे एक कोटी किंवा त्याहून अधिक संपत्ती आहे. अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे 24 टक्के उमेदवारही करोडपती आहेत.

उमेदवारांबाबत काही महत्वाच्या बाबी

कर्नाटक निवडणुकीत आम आदमी पक्षाने सर्वाधिक 17 महिलांना तिकीट दिले आहे. जेडीएसने 13, भाजपने 12 आणि काँग्रेसने 11 महिला उमेदवार उभे केले आहेत.

तर काँग्रेसचे उमेदवार प्रियकृष्ण हे सर्वाधिक कर्जबाजारी आहेत. प्रियकृष्ण यांच्यावर 881 कोटी रुपयांचे कर्ज आहे. निवडणूक लढवणाऱ्या तब्बल 592 उमेदवारांची संपत्ती 5 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक आहे. 49 उमेदवारांवर महिलांवरील गुन्हे दाखल आहेत. तसेच आठ उमेदवारांवर खुनाचा आरोप आहे आणि 35 उमेदवारांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: अजित पवारांनी विजय वडेट्टीवारांची घेतील सांत्वनपर भेट

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT