Karnataka Election esakal
देश

BJP MLA : दोन आमदारांनी राजीनामा देताच विधान परिषदेत भाजप आलं अल्पमतात; 'इतकी' झाली संख्या

दोन आमदारांच्या राजीनाम्यानं विधान परिषदेत भाजप (BJP) अल्पमतात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

राज्याच्या 75 सदस्यीय विधान परिषदेत भाजपला 39 इतके साधे बहुमत मिळाले होते.

बंगळूर : दोन आमदारांच्या राजीनाम्यानं विधान परिषदेत भाजप (BJP) अल्पमतात आला आहे. या महिन्यात भाजप नेते पुट्टण्णा आणि बाबूराव चिंचनसूर यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश केला. त्यामुळं ही स्थिती निर्माण झाली आहे.

राज्याच्या 75 सदस्यीय विधान परिषदेत भाजपला 39 इतके साधे बहुमत मिळाले होते. भाजपची संख्या आता 37 वर घसरली असून ती आणखी घसरण्याची शक्यता आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते अयानूर मंजुनाथ यांनी एमएलसी पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे.

तसेच, नामनिर्देशित आमदार ए. एच. विश्वनाथ यांनीही पुढे जाण्यासाठी काँग्रेसला पाठिंबा देणार आसल्याचे सूतोवाच केले आहे. तसेच भाजपचे परिषद सदस्य आर. शंकर यांनी राणेबेन्नूर विधानसभेचे तिकीट नाकारल्यास अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवू, अशी धमकी पक्षाला दिली आहे.

शंकर हे 2019 च्या राजकीय संकटात काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले. मात्र, त्यांना राणेबेन्नूर पोटनिवडणूक लढण्यासाठी तिकीट दिले गेले नाही. त्याऐवजी त्यांना आमदार करण्यात आले आहे. विधान परिषदेत सध्या भाजपकडे 37, काँग्रेसकडे 26 आणि धजदचे आठ सदस्य असून, व्यतिरिक्त एक अपक्ष आणि अध्यक्ष बसवराज होराट्टी आहेत. गेल्या वर्षी मे महिन्यात भाजपने वरच्या सभागृहात साधे बहुमत मिळवले होते, ज्यामुळे सरकारला अनेक विधेयके संमत करता आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT