HD Kumaraswamy esakal
देश

Karnataka Election Result : निकालापूर्वीच युतीबाबत कुमारस्वामींचं मोठं वक्तव्य; म्हणाले, आम्ही कोणत्याही पक्षाशी..

आमच्या अटी मान्य करणाऱ्या कोणत्याही पक्षासोबत आम्ही युती करण्यास तयार आहोत.

सकाळ डिजिटल टीम

कुमारस्वामी यांच्या त्या अटी म्हणजे सरकार चालवण्याचे स्वातंत्र्य देणे, कोणाचेही आदेश न घेणे, कोणाचेही नियंत्रण नसणे अशा आहेत.

बंगळूर : आमच्या अटी मान्य करणाऱ्या कोणत्याही पक्षासोबत आम्ही युती करण्यास तयार आहोत, असे धजद नेते आणि माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी (H. D. Kumaraswamy) यांनी सांगितले.

सिंगापूरला रवाना होण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘धजदला (JDS) ५० जागा मिळतील. धजद फार कमी जागांवर जिंकेल, असा अंदाज अनेक सर्वेक्षणांनी वर्तवला आहे; मात्र आमच्या पक्षाला ५० जागा मिळतीलच.’

कुमारस्वामी यांनी दोनदा युती सरकारच्या (Congress) काळात मुख्यमंत्री असताना एकदा भाजपसोबत (२००६) आणि नंतर काँग्रेससोबत (२०१८) युती केली होती. यावेळी ते युतीवर स्वाक्षरी करण्यापूर्वी आपल्या काही अटी घालणार आहेत. कुमारस्वामी यांच्या त्या अटी म्हणजे सरकार चालवण्याचे स्वातंत्र्य देणे, कोणाचेही आदेश न घेणे, कोणाचेही नियंत्रण नसणे अशा आहेत.

धजदच्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी करण्यासाठी युतीत असलेल्या पक्षांनी धजद आमदारांना जलसंपदा, ऊर्जा आणि सार्वजनिक बांधकाम यांसारखी खाती द्यावीत. सहयोगी पक्षाने मंड्या आणि हासन मतदारसंघापासून दूर राहावे. कोणतेही निर्णय चर्चेशिवाय घेऊ नयेत, अशी अट त्यांनी ठेवल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT