Congress candidate Vinay Kulkarni esakal
देश

Vinay Kulkarni : दीड वर्ष तुरुंगात, तरीही पक्षानं दिली मोठी जबाबदारी; 'या' उमेदवाराचा प्रचार न करता विजय

कुलकर्णी यांना धारवाड जिल्‍ह्यात प्रवेश करण्यास बंदी असूनही काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली.

सकाळ डिजिटल टीम

बेळगाव : एकही दिवस मतदारसंघात न जाता माजी मंत्री विनय कुलकर्णी (Vinay Kulkarni) यांनी धारवाडची लढाई जिंकली आहे. योगेश गौडा हत्याप्रकरणी (Yogesh Gowda Murder Case) संशयित आरोपी असलेल्या कुलकर्णी यांना न्यायालयाने धारवाड जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.

त्यामुळे कुलकर्णी यांना मतदारसंघात प्रचारासाठी जाता आले नाही. त्यांच्या पत्नी शिवलिला, तीन मुले व कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून कुलकर्णी यांना निवडून आणले आहे. त्यामुळे कुलकर्णी यांचा विजय राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे.

कुलकर्णी यांच्यासमोर मोठा पेचप्रसंग

मुळात कुलकर्णी यांना धारवाड जिल्‍ह्यात प्रवेश करण्यास बंदी असूनही काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली. शिवाय धारवाड (Dharwad) जिल्ह्यातील काँग्रेसच्या (Congress) उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारीही त्यांच्यावर सोपविण्यात आली. त्यामुळे धारवाड जिल्ह्यातील प्रवेशबंदी उठविण्याच्या मागणीसाठी कुलकर्णी यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. मात्र, न्यायालयाने त्यांच्यावरील बंदी कायम ठेवली. त्यामुळे कुलकर्णी यांच्यासमोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला होता.

कुलकर्णींना जिल्‍ह्यात बंदी

त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीही मतदारसंघात जाता आले नव्हते, त्यांच्यातर्फे पत्नी शिवलिला यांनी कार्यकर्त्यांसह जावून अर्ज दाखल केला होता. या निवडणुकीत कुलकर्णी यांना ८९ हजार ३३३ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी व भाजपचे उमेदवार अमृत देसाई यांना ७१ हजार २१९ मते मिळाली.

2018 साली विनय कुलकर्णींचा पराभव

२०१८ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत विनय कुलकर्णी यांचा पराभव झाला होता. अमृत देसाई यांनीच त्यांचा पराभव केला होता. निवडणुकीआधी काही वर्षे म्हणजे १५ जून २०१६ रोजी भाजपचे जिल्हा पंचायत सदस्य योगेश गौडा यांची धारवाड येथे हत्या झाली होती. त्यावेळी विनय कुलकर्णी हे मंत्री होते. या हत्या प्रकरणाशी त्यावेळी कुलकर्णी यांचे नाव जोडण्यात आले होते. २०१९ साली राज्यात भाजपची सत्ता आली, त्यावेळी योगेश गौडा हत्याप्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले.

सीबीआयकडून कुलकर्णी यांच्या विरोधात गुन्हा

सीबीआयकडून त्यावेळी कुलकर्णी यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. याप्रकरणी डिसेंबर २०२० मध्ये कुलकर्णी यांना अटक करण्यात आली. सुमारे दीड वर्षे कुलकर्णी हे बेळगावातील हिंडलगा कारागृहात होते. ऑगस्ट २०२२ मध्ये कुलकर्णी यांना जामीन मिळाला होता, पण न्यायालयाने धारवाड जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घातली होती, पण बंदी असूनही कुलकर्णी लढले अन् जिंकलेही.

हायटेक प्रचारावर भर

इंटरनेट व तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी मतदारांसोबत ऑनलाईन संपर्क साधला, पण या सर्व घटनांमुळे कुलकर्णी यांच्याबद्दल मतदारांमध्ये सहानुभूती निर्माण झाली, त्याचाही फायदा कुलकर्णी यांना झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT