Karnataka Election Result Basavaraj Bommai resigns as Karnataka CM after BJP defeat 
देश

Basavaraj Bommai Resignation CM Post : महाराष्ट्राला त्रास देणाऱ्या बसवराज बोम्मई यांनी मुख्यमंत्रीपदाचा दिला राजीनामा

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अखेर आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

धनश्री ओतारी

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अखेर आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. रात्री उशिरा बोम्मई यांनी राज्यपालांची भेट घेटली आणि त्यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारला आहे. (Karnataka Election Result Basavaraj Bommai resigns as Karnataka CM after BJP defeat)

कर्नाटक निवडणुकीत भाजपच्या पराभवानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते बसवराज बोम्मई यांनी शनिवारी संध्याकाळी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. यासंदर्भात भाजप नेते बोम्मई यांनी सांगितले की, मी राज्यपालांकडे वेळ मागितला आणि राजीनामा दिला आहे. ते म्हणाले की, राज्यपालांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

कर्नाटकमध्ये काँग्रेसला 136 जागेवर विजयी होत स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर, भाजप 65 जागा विजयी होत पराभूत झाले आहे.

बोम्मई यांनी २ सप्टेंबर २०२१ रोजी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. बोम्मई यांनी विधानसभेत झालेला पराभव स्वीकारला आहे. या संपुर्ण पराभवाची जबाबदारी घेण्यासाठी मी तयार आहे अशी प्रतिक्रिया बोम्मई यांनी दिली आहे. बोम्मई यांनी विधानसभेत झालेला पराभव स्वीकारला आहे. या संपुर्ण पराभवाची जबाबदारी घेण्यासाठी मी तयार आहे अशी प्रतिक्रिया बोम्मई यांनी दिली आहे.

राजकीय प्रवास

बसवराज बोम्मई यांनी २००८ साली जेडीएस पक्षातून भाजपामध्ये प्रवेश केला होता. बोम्मई यांच्यावर समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष विचारांच्या राजकारणाचे संस्कार झाले होते. त्यांचे वडील आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. आर. बोम्मई हे मानवतावादी चळवळ आणि डावे नेते एम. एन. रॉय यांचे कट्टर अनुयायी होते.

बसवराज बोम्मई यांनी १९९६-९७ साली राजकारणात पाऊल ठेवले. तत्कालीन मुख्यमंत्री आणि जनता दलाचे नेते जे. एच. पटेल यांचे राजकीय सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. २००७ साली वडील एस. आर. बोम्मई यांचे निधन झाल्यानंतर बसवराज यांनी निवडणुकीच्या राजकारणात पाऊल ठेवले.

यासाठी त्यांच्या हयातीत बसवराज बोम्मई निवडणुकीला उभे राहिले नाहीत. ऑक्टोबर २००७ रोजी वडीलांचा मृत्यू झाल्यानंतर बोम्मई यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला.

भाजपाचे सर्वात मोठे नेते, लिंगायत समाजाचे पुढारी बीएस येडियुरप्पा यांनी बोम्मई यांना मदतीचा हात दिला. बोम्मई यांनी तेव्हाच शिग्गाव हा मतदारसंघ निवडला. याठिकाणी भाजपाचा कोणताही मोठा नेता नव्हता. २०१३, २००१८, आणि आता २०२३ साली सलग या मतदारसंघात बोम्मई विजयी झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT