Karnataka Election Result 
देश

Karnataka Election Result: अखेर फडणवीस यांनी सांगितलं तसंच झालं NCP चं पार्सल पवारांच्या घरी

निपाणीत भाजपचा विजय

धनश्री ओतारी

निपाणीमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं तसंच झालं. भाजपच्या शशिकला जोल्ले यांचा विजय झाला. तर शरद पवारांना धक्का बसला आहे. उत्त्म पाटील यांचा पराभव झाला आहे. . (Karnataka Election Result bjp Candidate shashikala jolle win against Ncp Candidate Uttam Patil )

भाजपच्या शशिकला जोल्ले, काकासाहेब पाटील, उत्तमराव पाटील आणि जयराम मिरजकर यांच्यात चौरंगी लढत झाली होती. सुरुवातीच्या निकालानुसार, राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तमराव पाटील आघाडीवर होते तर भाजपच्या जोल्ले या दुसऱ्या क्रमांकावर होत्या. मात्र, काही कालावधीनंतर हे चित्र पालटले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निपाणीत सभा घेतली होती. त्या ठिकाणी त्यांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला होत. हा राष्ट्रवादी महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्याचा पक्ष आहे. कर्नाटकात येऊन काय डोंबलं करणार? इथं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मिलगीभगत आहे. हे पार्सल महाराष्ट्रात पाठवून द्या, त्याचं काय करायचे बघतो. काँग्रेसला आता राहिलेच नाही अशा शब्दांमध्ये देवेंद्र फडणीस यांनी हल्लाबोल केला होता.

त्याचवेळी ज्येष्ठ नेते शरद पवार हे उत्तमराव पाटील यांच्यासाठी मैदानात उतरले होते. त्या ठिकाणी सभा घेत पवारांन फडणवीसांना सडेतोड उत्तर दिले होते. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी मतदानादरम्यान निपाणीत तळ ठोकला हेाता.

निपाणी मतदारसंघात गेली पाच वर्षे उत्तम पाटील यांनी कोरोना, महापूर काळात अरिहंत उद्योगसमूहाच्या माध्यमातून केलेले कार्य वाखाण्याजोगे आहे. कोणतेही पद नसताना या व्यक्तीच्या माध्यमातून मतदारसंघात आजवर झालेली कामे थक्क करणारी आहेत. मात्र, मतदारांना पाटील यांना डावलले.

जोल्ले २००८ साली पराभव झाल्यानंतर २०१३ साली त्यांनी विजय मिळवत निपाणी मतदा संघात पहिल्या महिला आमदार म्हणून मान मिळवला. यानंतर सलग ५ वर्षे मतदार संघात मोठ्याप्रमाणात विकासकामे केली. पक्ष वाढीसाठीही त्यांनी मोठे काम केले. कर्नाटक मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Attack: होर्मुझमधील तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यात 2 भारतीय खलाशी बेपत्ता

Kankavli Police Constable Death : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिला पोलिस हवालदाराचा जंगलात आढळला मृतदेह; झाडाला घेतलेला गळफास, तिचा नवरा आहे पोलिस दलात...

सहा वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार ही गाजलेली नायिका; 'वहिनीसाहेब' बनून प्रेक्षकांच्या मनावर केलेलं राज्य, कोण आहे ती?

Latest Marathi News Live Update : वकिलांशी कथित गैरवर्तन; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

Uttarakhand: चीन-नेपाळ सीमेवरील जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाची नवी संधी; पहिल्या वर्षी ५० एमबीबीएस जागा

SCROLL FOR NEXT