Karnataka CM
Karnataka CM Esakal
देश

Karnataka CM: अवघ्या २३ व्या वर्षी देवेगौडांना धडक दिली आणि डीके शिवकुमार नावाचं वादळ उदयास आलं

अक्षता पांढरे

डोडालहल्ली केंपनगोवडा शिवकुमार अर्थात डी.के शिवकुमार. कर्नाटक काँग्रेसमधील फेमस नाव. काँग्रेसचे संकटमोचक अशी त्यांची ओळख. आताही कर्नाटकात काँग्रेसने जी एकहाती सत्ता मिळवली ती डी.के शिवकुमार यांच्यामुळे आणि सध्या ते ५ वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या सिद्धरामय्या यांच्यासोबत मुख्यमंत्री पदासाठी तगडे उमेदवार मानले जात आहेत. त्यामुळे डीके शिवकुमार आहेत तरी कोण? जाणून घेऊ…

डीके शिवकुमार राजकारणी असण्यासोबत एक शिक्षणतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत. 2006 मध्ये कर्नाटक स्टेट ओपन युनिव्हरसिटी राज्यशास्त्रातील मास्टर आॅफ आर्ट्समध्ये पदव्यूत्तर शिक्षण घेतले,

1979 मध्ये डीके कॉलेजमध्ये असताना कर्नाटकचे पहिले मुख्यमंत्री राहिलेले देवराज उर्स आणि इंदिरा गांधी यांच्यात वाद सुरु झाले. अशातचं देवराज यांनी पक्षात फूट पाडली.

राज्यातील अनेक नेते आणि युवक काँग्रेसमधला मोठा गटही देवराज यांच्यासोबत गेला. त्यावेळी शिवकुमार हे युवक काँग्रेसचे सदस्य होते. त्यांना स्टुडंट युनियनचे सेक्रेटरी बनवण्यात आलं आणि विद्यार्थ्यांना जोडण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली गेली आणि इथून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली.

अशात 1985 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने दिग्गज नेते एचडी देवेगौडा यांच्या विरोधात डीके शिवकुमार यांना सातनूर मतदारसंघातून उभे केले. एचडी देवेगौडा म्हणजे कर्नाटकाच्या राजकारणातील मोठ नाव चार वेळा आमदार आणि विधानसभेचे दोन वेळा विरोधी पक्षनेते पद त्यांनी सांभाळयं. आणि भारताचे पंतप्रधान देखील राहिलेत. आणि अशी दिग्गज नेत्यापुढं शिवकुमार यांनी उभं केलं. पण डिकेंनी त्यांनी कडवे आव्हान दिले. मात्र निवडणुकीत त्यांचा 15 हजारांनी पराभव झाला.

पण देवेगौडा यावेळी दोन जागांवर निवडणूक लढवली. त्यामुळेच त्यांनी विजयानंतर सातनूरची जागा सोडली. त्यानंतर या जागेवर पोटनिवडणूक झाली. ज्यात डीके शिवकुमार विजयी झाले. तो दिवस आणि आजपर्यंत डीके शिवकुमार यांना पराभवाचा सामना करावा लागला नाही.

शिवकुमार सथानूरमधून ४ वेळा आमदार झाले. 1989, 1994, 1999 आणि 2004 मध्ये त्यांनी या जागेवरून विजय मिळवला होता. त्यानंतर 2008 मध्ये कनकपुरा मतदारसंघातून ते विजयी झाले.

दरम्यान, डी.के शिवकुमार हे कर्नाटक काँग्रेसमधील सर्वात श्रीमंत नेते आहेत. त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने आहेत. त्यांच्याकडे 840 कोटींहून अधिक संपत्ती आहे. जेव्हा-जेव्हा काँग्रेस पक्षाला निधीची गरज भासते, तेव्हा शिवकुमार तिथे उभे राहतात, म्हणजेच ते पक्षासाठी एकप्रकारे संकटमोचकाची भूमिका बजावत असतात.

डी.के शिवकुमार सीबीआय, ईडी आणि प्राप्तिकर विभागाच्या चौकशीच्या फेऱ्यात आहेत. 2019 च्या सप्टेंबरमध्ये, ईडीने डीके यांना मनी लाँड्रिंग आणि कर चुकवेगिरी प्रकरणी अटक केली होती. 4 ते तुरुंगात होते. मात्र ते जामिनावर बाहेर आहेत.

शिवकुमार हे वोक्कालिगा समाजातून येतात. कर्नाटकात वोक्कालिगा समाजाची मोठी व्होट बँक आहे. जुनं म्हैसूर आणि दक्षिण कर्नाटक प्रदेशात प्रामुख्यानं वोक्कालिगा समुदायाचे लोक राहतात. अशा परिस्थितीत डीके शिवकुमार या लोकांना एकत्र करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

एवढचं नाही, देशात जे रिसॉर्ट पॉलीटीक्स खेळलं जात, म्हणजे सत्ता स्थापनेवेळी विश्वास दर्शक ठरावावेळी आमदारांना दूर एकत्र एका रिसॉर्टमध्ये ठेवलं जात. आणि सरकार वाचवलं जात त्याला रिसॉर्ट पॉलीटीक्स म्हणतात आणि याचं जनक हे डीके शिवकुमार आहेत. उदाहरण घ्यायचं तर एकनाथ शिंदेंनी आणि आमदारांचा सुरत - गुवाहाटी दौरा.

दरम्यार सध्याच्या निवडणूकीत डीके शिवकुमार त्यांच्या पारंपरिक मतदारसंघ कनकपुरा येथून निवडणूक लढवत होते. पारंपारिक जागा कारण ते येथून आठ वेळा आमदार झाले आहेत. कनकपुरा येथे ते भाजप सरकारमध्ये महसूल मंत्री असलेले आर अशोक यांच्या विरोधात होते. ज्यांचा त्यांनी पराभव केला आहे. आणि तेही १ लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने

या निवडणूकीत त्यांनी काँग्रेसला एकहाती सत्ता मिळवून दिली. कर्नाटक काँग्रेसचे चाणक्या मानले जाणारे डीके शिवकुमार हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: विमा घेऊनही चिंता कायम! 43 टक्के पॉलिसी धारकांना मिळत नाही क्लेम; धक्कादायक अहवाल समोर

Water Crisis: देशासमोर पाण्याचे संकट, 150 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी घसरली

लग्न झालेलं असो किंवा नसो, स्वेच्छेने ठेवलेल्या लैंगिक संबंधांना चुकीचं म्हणता येणार नाही- हायकोर्ट

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Latest Marathi News Live Update : दिल्लीच्या रस्त्यावर थरार, पोलीस गुंडांमध्ये चकमक

SCROLL FOR NEXT