narendra modi and rahul gandhi 
देश

Rahul Gandhi : जेथे केलेल्या वक्तव्यामुळे खासदारकी गेली, तिथूनच राहुल फुंकणार मोदींविरोधात रणशिंग

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : कर्नाटकातील निवडणुकीची घोषणा झाल्यापासून सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीत मुख्य लढत काँग्रेस आणि भाजपमध्ये असल्याचे मानले जात आहे.

निवडणुकीची घोषणा झाल्यापासून दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडून टीकाही सुरू झाल्या आहेत. भाजपकडून निवडणुकीत पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांसारखे दिग्गज नेते प्रचारात उतरणार आहेत. तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी काँग्रेसच्या प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत. विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी 2019 मध्ये ज्या ठिकाणाहून पीएम मोदींबाबत वक्तव्य केले होते, त्याच ठिकाणाहून ते कर्नाटकमधील प्रचाराची सुरुवात करणार आहेत.

कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 संदर्भात निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत निवडणूक आयोगाने राज्यात १० मे रोजी मतदान होणार असल्याचे जाहीर केले. 13 मे रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या 2023 च्या तारखा जाहीर केल्या. कर्नाटकात विधानसभेच्या एकूण 224 जागा आहेत.

सध्या राज्यात भारतीय जनता पक्षाची (भाजप) सत्ता असून बसवराज बोम्मई मुख्यमंत्री आहेत. कर्नाटकात एकूण 5,21,73,579 मतदार आहेत, तर 9.17 लाख नवीन मतदारांची भर पडली आहे. 1 एप्रिल रोजी 18 वर्षे पूर्ण करणाऱ्यांनाही मतदान करता येणार आहे. 100 बुथवर दिव्यांग कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: आदल्या दिवशी वाद; नंतर तलवार घेऊन तरुण हॉटेलमध्ये घुसला अन्... नवी मुंबईत मॅनेजरसोबत काय घडलं?

Pune Bangalore Highway Accident : देवदर्शनावरून परतताना काळाचा घाला! पुणे–बंगळूर महामार्गालगत पिकअप पलटी; 11 भाविक जखमी, तिघांची प्रकृती गंभीर

ग्लेन फिलिप्स फक्त मैदानातच उडत नाही, तर आकाशात विमानही उडवतो; स्वत:च शेअर केला Video

Mumbai Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर रक्ताचा सडा! खोपोली बोगद्याजवळ 5 गाड्यांचा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; 3 जण जागीच ठार

प्रेक्षकांचा अंदाज चुकला! 'स्वामी समर्थ' नाही तर कलर्स मराठीची 'ही' गाजलेली मालिका होतेय बंद; शूट झाला शेवटचा भाग

SCROLL FOR NEXT