karnataka former cm and Congress leader Siddaramaiah misbehaving with a woman video viral
karnataka former cm and Congress leader Siddaramaiah misbehaving with a woman video viral 
देश

सिद्धारामय्यांनी ओढली महिलेची ओढणी...

वृत्तसंस्था

बंगळूरू: काँग्रेस नेते व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी एका महिलेची ओढणी ओढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपने काँग्रेसवर टीकेची झोड उठविली आहे.

म्हैसूरमधील एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान हा प्रकार घडला आहे. सिद्धारामय्यां यांच्याकडे एक महिला तक्रार सांगत होती. परंतु, सिद्धारामय्यांनी दिलेल्या उत्तरावर महिलेचे समाधान होऊ शकले नाही. त्यामुळे ती वाद घालू लागली. सिद्धारामय्या महिलेला शांत बसण्यास सांगत होते. परंतु, महिला ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. महिलेला शांत करण्याच्या प्रयत्नात सिद्धारामय्या यांच्याकडून तिची ओढणी ओढली गेली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

'सिद्धारामय्या यांनी ज्या प्रकारे संबंधित महिलेशी गैरवर्तन केले. त्यावरून त्यांचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन दिसून आला. हा गुन्हा आहे. आता सिद्धारामय्या यांच्यावर काय कारवाई करणार याचे उत्तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी द्यावे,' असे भाजपचे नेते प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे.

या प्रकारावर स्पष्टीकरण देताना काँग्रेस नेते दिनेश गुंडू राव म्हणाले, 'कधीकधी लोक टोकाचे प्रश्न विचारतात. त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतरही ते शांत राहत नाहीत. त्यामुळे तुम्ही त्यांच्या हातातील माईक खेचण्याचा प्रयत्न करता. माईक खेचतानाच सदर महिलेची ओढणी खेचली गेली. त्या महिलेशी गैरवर्तन करण्याचा सिद्धारामय्या यांचा हेतू नव्हता.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

SCROLL FOR NEXT