Tirupati Balaji Temple Laddu Controversy esakal
देश

तुपात चरबीचा अंश आढळला अन् सरकार खाडकन् झालं जागं; आता तुपाच्या टँकरवर असणार GPS, इलेक्ट्रॉनिक लॉक

Nandini Milk : गत वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी (CM Jaganmohan Reddy) यांनी तुपाचा दर अधिक असल्याच्या कारणावरून ‘नंदिनी’ तूप विकत घेण्यास नकार दिला.

संजय उपाध्ये

तुपात जनावरांच्या चरबीचा अंश आढळून आल्याच्या प्रकरणानंतर कर्नाटक सरकार खाडकन् जागे झाले आहे.

बंगळूर : जगातील श्रीमंत देवस्थान असलेल्या तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादाच्या लाडूसाठी (Tirupati Balaji Temple Laddu Controversy) कर्नाटक सरकार तूप पाठविते. कर्नाटक मिल्क फेडरेशनच्या (केएमएफ) ‘नंदिनी’ ब्रँडचे ते दर्जेदार तूप आहे. मात्र, आता लाडूत आढळून आलेल्या जनावरांच्या चरबीमुळे वाद निर्माण झाल्यानंतर कर्नाटक सरकार खडबडून जागे झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून तिरुपतीला पाठविण्यात येणाऱ्या तुपाच्या टँकरमध्ये ‘जीपीएस’ आणि इलेक्ट्रॉनिक लॉक सिस्टिम बसविण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने (Karnataka Government) घेतला आहे.

‘केएमएफ’ तिरुपतीला वर्षाला तीन ते चार हजार टन तूप पाठवत होते. तिरुपतीला २०१३ आणि २०१८ मध्ये तीन हजार टन तुपाची विक्री केली, तर २०१९ मध्ये ती विक्री घटून १७०० टन झाली. पंधरा वर्षांपासून कंत्राटी तत्त्वावर तूप दिले जात आहे. मात्र गत वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी (CM Jaganmohan Reddy) यांनी तुपाचा दर अधिक असल्याच्या कारणावरून ‘नंदिनी’ तूप विकत घेण्यास नकार दिला. त्यानंतर पंधरा दिवसांपासून पुन्हा नंदिनी तुपाला देवस्थानम्‌ने पसंती दिली.

मात्र, तुपात जनावरांच्या चरबीचा अंश आढळून आल्याच्या प्रकरणानंतर कर्नाटक सरकार खाडकन् जागे झाले आहे आणि कर्नाटकातून पाठविण्यात येणाऱ्या टँकरमधील तुपात प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारची भेसळ होऊ नये, यासाठी टँकरमध्ये ‘जीपीएस’ यंत्रणा आणि टँकरला इलेक्ट्रॉनिक लॉक सिस्टिम बसविण्याचा निर्णय घेतला आहे. ‘ओटीपी’शिवाय इलेक्ट्रॉनिक लॉक सिस्टिम उघडणार नाही, याचीही दक्षता घेणार आहे.

पंधरा दिवसांपासून ‘केएमफ’ देवस्थानम्‌कडून ऑर्डर स्वीकारली असून तीन महिन्यांसाठी ३५० टन तूप विक्री करणार आहे. त्यानंतर देवस्थानम्‌ने असा विश्‍वास दिला आहे की, तीन महिन्यांचे कंत्राट संपल्यानंतर ‘केएमएफ’कडून नियमित तूप विकत घेणार आहे. वर्षाला ३ हजार ५०० टनाचे कंत्राट असेल. त्याची सुरुवात झाली असून काही दिवसांपूर्वी पहिला टँकर पाठविला आहे.

आम्हाला आनंद आहे की, केवळ तिरुपती देवस्थान्‌मच ‘नंदिनी’चे तूप घेत नाही, तर कर्नाटकातील मोठ्या मंदिरातील प्रसादासाठीही तूप पुरवतो. त्यामुळे तुपाची मागणी पूर्ण करण्यासाठी त्याचे उत्पादन वाढविण्याचा विचार करत आहोत.

-भीमा नाईक, अध्यक्ष, कर्नाटक मिल्क फेडरेशन

  • ‘केएमएफ’ला मिळाले तीन महिन्यांसाठी कंत्राट

  • टँकरद्वारे ३५० टन तूप देणार

  • वर्षाला ३५०० टन तुपाचे कंत्राट मिळणार

  • पहिला टँकर तिरुपतीकडे रवाना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT