Karnataka Result
Karnataka Result esakal
देश

Karnataka Result: अखेर डी. के. शिवकुमार सुद्धा दिल्लीला निघाले, मुख्यमंत्रीपदावर होणार निर्णय

रुपेश नामदास

कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री पदावरून काँग्रेसमध्ये बैठकीचे सत्र सुरू आहे. काँग्रेस नेते सिद्धरामय्या हे पक्षश्रेंठींची भेट घेण्यासाठी दिल्लीत पोहोचले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेले डीके शिवकुमार यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली, आणि मुख्यमंत्री पदावरून प्रतिक्रिया दिली.

सिद्धरामय्या यांच्या बहुमताच्या दाव्यावर ते म्हणाले की, काँग्रेसचे सगळे आमदार माझे आहेत. सर्व आमदारांनी मुख्यमंत्रीपदा बाबदचा निर्णय पक्ष हायकमांडवर सोडला आहे. Latest Marathi News

तर २०१९ मधील पक्ष फुटीवर बोलताना म्हणाले, काँग्रेसचे आमदार फुटल्यानंतर मी आशा सोडली नाही, लढलो आणि काँग्रेसला इथपर्यंत आणले. गेल्या पाच वर्षांत माझ्यावर आलेल्या संकटाबाबत मी योग्य वेळी बोलणार आहे. काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने मला आणि सिद्धरामय्या यांना दिल्लीला बोलावले आहे. माझे कुटुंबाची आणि गुरुंची भेट घेऊन मी दिल्लीला रवाना होणार आहे.

तर पुढे शिवकुमार म्हणाले की, मी एकटा माणूस आहे, माझा एका गोष्टीवर विश्वास आहे की एकच माणूस धैर्याने बहुसंख्य बनतो. 2019 मध्ये आमच्या सर्व आमदारांनी पक्ष सोडला तेव्हाही मी हार मानली नाही.

दरम्यान आज कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यात आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार असलेले सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांना काँग्रेस हायकमांडने दिल्लीला बोलावलं आहे. तर मुख्यमंत्री पदाचे निरीक्षक सुशिल कुमार शिंदे देखील दिल्लीमध्येच आहेत.

पक्षाचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी चुरशीची लढत आहे. या दोघांपैकी कोणाला मुख्यमंत्रिपदावर विराजमार करायचे हे खर्गे ठरवतील. कर्नाटक काँग्रेस विधिमंडळ पक्षाने रविवारी झालेल्या बैठकीत मल्लिकार्जुन खर्गे यांना राज्याचा नवा मुख्यमंत्री निवडण्यासाठी अधिकृत करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma : माझं काय, हा शेवटचा… रोहित शर्माच्या वक्तव्यामुळे उडाली खळबळ; KKR ने डिलीट केलेला Video पुन्हा झाला Viral

Latest Marathi News Live Update: पुण्यात गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे झाडपडीच्या घटना वाढल्या

Sarfarosh : आमिरची आपुलकी आणि सोनालीची गळाभेट; 25 वर्षांनंतर 'सरफरोश'च्या टीमला भेटून सुकन्या भारावल्या

Melissa McAtee: माझ्या जीवाचे काही बरं वाईट झालं तर ... फायझरच्या व्हिसलब्लोअरने व्हिडिओ शेअर करत केलं धक्कादायक वक्तव्य

Narhari zirwal: झिरवळ अजितदादांसोबतच! मविआच्या उमेदवारासोबतच्या व्हायरल फोटोबाबत केला खुलासा म्हणाले, "लोकांच्या आग्रहाखातर...."

SCROLL FOR NEXT