Protests erupt by students at college campus टिम ई सकाळ
देश

हिजाबप्रकरणावरून राडा.. भगवे शाॅल घेत विद्यार्थी आमने सामने

आज कर्नाटक उच्च न्यायालय हिजाब बंदीविरोधातील याचिकेवर सुनावणी करणार

सकाळ डिजिटल टीम

कर्नाटकातील उडुपी येथील महात्मा गांधी मेमोरियल कॉलेजमध्ये हिजाब (Hijab) परिधान करण्याच्या मागणीवरून वाद चांगलाच चिघळताना दिसत आहे. उडुपी येथील महात्मा गांधी मेमोरियल कॉलेजमध्ये हिजाब परिधान केलेले विद्यार्थी आणि भगवे टोले-हेडगियर घातलेल्या विद्यार्थ्यांच्या दुसर्‍या गटाने कॉलेज कॅम्पसमध्ये घोषणा दिल्याने जोरदार निदर्शने सुरू केली आहे.

महाविद्यालय प्रशासनाच्या कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय विद्यार्थ्यांना हिजाब परिधान करून वर्गात जाण्याची परवानगी देण्यासाठी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिकासुध्दा दाखल करण्यात आली होती. आज कर्नाटक उच्च न्यायालय राज्यातील अनेक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये हिजाब बंदीविरोधातील या याचिकेवर सुनावणी करणार आहे. या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी मेमोरियल कॉलेजमध्ये हिजाब परिधान केलेले विद्यार्थी आणि भगवे टोले-हेडगियर घातलेल्या विद्यार्थ्यांच्या दुसर्‍या गटाने कॉलेज कॅम्पसमध्ये निदर्शने सुरू केली आहे.

कर्नाटकातील (Karnataka) उडुपी जिल्ह्यातील महात्मा गांधी मेमोरियल कॉलेजमध्ये मुस्लीम मुलीनी हिजाब (Hijab) घालू देण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले होते. हिजाब परीधान करून वर्गात प्रवेश दिला जात नसल्याचा आरोप या मुस्लीम विद्यार्थिनींनी केला होता त्यानंतर हा वादाला चांगलेच तोंड फुटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या कमाईमध्ये सोमवारी घट, ४ दिवसांत कमावले 'इतके' कोटी

Pune Vande Bharat New: वाल्ह्यात वंदे भारत एक्स्प्रेस तीन तास ठप्प, रेल्वे कर्मचाऱ्यांची माणुसकी, नेमकं काय घडलं!

Blog: केंद्राला नामांतराचा ज्वर; केंद्रात कोणत्याही पक्षाचे सरकार येवो; प्रत्येक पक्षाला नामांतराचा ज्वर चढलेला असतो.

होर्मुझमध्ये अमेरिकेचा हल्ला, मालवाहू जहाजाला केलं लक्ष्य, पाच जणांचा मृत्यू; इराणी मीडियाचा मोठा दावा...

Petrol-Diesel Price: निवडणुकांचे निकाल लागले… आता LPG नंतर पेट्रोल-डिझेलही महागणार? जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर

SCROLL FOR NEXT