Coronavirus esakal
देश

पुन्हा लॉकडाऊन? केरळात कोरोनाचा नवीन प्रकार सापडताच 'या' राज्यात मास्कसक्ती; सरकाराने दिले महत्त्वाचे आदेश

केरळमधून येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मास्क घालणे बंधनकारक करण्यासाठी आम्ही आज अधिकृत आदेश जारी करू.

बंगळूर : देशात कोरोनाचे (Coronavirus) नवीन प्रकार आढळून आल्यानंतर राज्य सरकारने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केली आहे. ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक तसेच हृदयाशी संबंधित आणि दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींना मास्क (Mask) वापरणे बंधनकारक केले आहे.

दरम्यान, केरळमधून येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. कोडगू जिल्ह्यातील कुशालनगर येथे पत्रकारांशी बोलताना आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव म्हणाले, कालपासून (ता. १८) ६० वर्षांवरील व्यक्तींसाठी मास्क अनिवार्य करण्यात आले आहेत. यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनाचे नवीन प्रकार सापडले आहेत. याबाबत कोणीही काळजी करण्याची गरज नाही. तथापि, ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांसाठी मास्क अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. ६० वर्षांवरील काही नागरिक हृदय, मूत्राशय आणि इतर आजारांनी ग्रस्त आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून मास्क वापरण्याची विनंती केली आहे. त्यांना मास्क घालणे बंधनकारक करण्यासाठी आम्ही आज अधिकृत आदेश जारी करू, असेही ते म्हणाले.

ते म्हणाले, ‘कोरोना विषाणूचा शोध लागल्यानंतर अधिकाऱ्यांची बैठकही घेतली आहे. त्यावर काय कार्यवाही करावी, यावर चर्चा केली आहे. आम्ही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या संपर्कात आहोत. केरळमधून येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनाच्या नवीन व्हायरंटमुळे रुग्णसंख्या वाढतील की नाही, हे दोन-तीन दिवसांत कळेल. भविष्यातील परिस्थिती लक्षात घेऊन निर्बंध लादायचे की नाही, हे ठरवले जाईल.’

सध्या कोणतेही निर्बंध लादणार नाही

मात्र सध्या कोणतेही निर्बंध लादण्याची गरज नाही. रुग्णालय आणि आरोग्य केंद्रांमध्ये सर्व तयारी आधीच करण्यात आली आहे. ज्यांना श्वासोच्छवासाचा त्रास आणि ताप आहे त्यांचीही कोरोना चाचणी सक्तीची केली जात आहे, असे गुंडूराव म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT