Priyanka Gandhi Reaction Karnataka Hijab Row e sakal
देश

'बिकिनी असो की घुंघट, तो...' प्रियंका गांधींची हिजाबवरून थेट प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : कर्नाटमध्ये हिजाबवरून राजकारण चांगलंच (Karnataka Hijab Row) तापलं आहे. हिजाब घातलेल्या मुलींना महाविद्यालयात प्रवेश नाकारला जात आहे. तसेच त्यांनी हिजाब घातला तर आम्ही भगवे शेले घेऊ, अशी भूमिका हिंदूत्ववादी विद्यार्थ्यांनी घेतली आहे. त्यावरून आता काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi Reaction Karnataka Hijab Row) यांनी रोखठोक आणि थेट प्रतिक्रिया दिली आहे.

काय परिधान करायचं हा महिलांचा अधिकार आहे. मग ते बिकिनी असेल किंवा घुंगट, जिन्स असेल किंवा हिजाब. त्यांनी काय घालायचं हे तुम्ही ठरवू शकत नाही. हा भारताच्या संविधानाने महिलेला दिलेला अधिकार आहे. महिलांचं शोषण करणं, तिचा छळ करणं थांबवा, असं प्रियंका गांधी म्हणाल्या.

नेमकं काय आहे प्रकरण? -

कर्नाटकमधील उडपीमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून हिजाबवरून वातावरण तापलं आहे. विद्यार्थ्यांनी एकाच गणवेशात शाळा-महाविद्यालयात यावं, असा निर्णय येथील सरकारने घेतला आहे. त्यामुळे हिजाब घातलेल्या विद्यार्थिंनींना प्रवेश नाकारला जात आहे. खुद्द प्राचार्य महाविद्यालयाच्या गेटवरून मुलींना घरचा रस्ता दाखवत आहेत. मंगळवारी कर्नाटकातील पीईएस महाविद्यालयातील एक व्हिडिओ समोर आला होता. यामध्ये एक मुस्लीम विद्यार्थिनी येताच काही भगवे शेले घातलेल्या विद्यार्थ्यांनी तिला घेराव घातला आणि ''जय श्री राम'' अशी घोषणाबाजी केली. त्यानंतर मुलीनं ''अल्लाह हू अकबर'' म्हणत या मुलांना उत्तर दिले. तरीही हिंदूत्ववादी विद्यार्थ्यांनी हुल्लडबाजी केली. त्यानंतर हे प्रकरण चांगलंच चिघळलं आहे. सध्या या प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

Pune News : पेशवेकालीन भूमिगत जलवाहिनी जीर्णोद्धारास स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी

CGHS नियमांमध्ये मोठा बदल! आता आई-वडील किंवा सासू-सासरे यांच्यापैकी एकालाच मेडिकल लाभ मिळणार; नवा नियम लागू

PBKS vs MI Live : शार्दूल ठाकूरची 'स्टम्प' तोड गोलंदाजी! पंजाबने ३३ धावांत गमावले ६ फलंदाज; 'लॉर्ड'च्या ४ विकेट्सने फिरली मॅच Video

SCROLL FOR NEXT