Legislative Council Speaker Basavaraj Horatti esakal
देश

भाजपच्या 'या' आमदाराची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद; एकाच मतदारसंघातून तब्बल 8 वेळा विजयी!

होरट्टी हे पश्चिम शिक्षक मतदारसंघातून निवडून गेल्या ४३ वर्षांपासून विधान परिषदेचे सदस्य आहेत.

सकाळ डिजिटल टीम

शिक्षकातून राजकारणी झालेले होरट्टी हे अनेक वर्षे धजदसोबत होते आणि दहा मेच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये (BJP) सामील झाले.

बंगळूर : विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी (Basavaraj Horatti) यांनी एकाच मतदारसंघातून आठ वेळा मिळवलेल्या विजयाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये (Limca Book of Records) झाली आहे. हा एकप्रकारे त्यांचा एक विक्रम मानला जात आहे.

होरट्टी हे पश्चिम शिक्षक मतदारसंघातून निवडून गेल्या ४३ वर्षांपासून विधान परिषदेचे सदस्य आहेत. या ७७ वर्षीय दिग्गज आमदाराचे नाव ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’’मध्ये या वर्षासाठी नोंदवण्यात आले आहे. शिक्षकातून राजकारणी झालेले होरट्टी हे अनेक वर्षे धजदसोबत होते आणि दहा मेच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये (BJP) सामील झाले.

पण, त्याच मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली आणि जिंकली. पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू ११ वेळा विधानसभेवर निवडून आले, परंतु ते मतदारसंघातून. होरट्टी मात्र १९८० पासून एकाच मतदारसंघातून सर्व निवडणुका जिंकल्या आहेत. त्यांना आमदार होऊन ४३ वर्षे २०१ दिवस झाले आहेत.

२०२२ मध्ये होरट्टी यांचे नाव ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’’मध्ये देखील नोंदवले गेले. होरट्टी यांनी विविध खात्याचे मंत्री म्हणून काम केले आहे आणि ते तिसऱ्यांदा विधान परिषदेचे सभापती आहेत, जो त्यांचा स्वतःचाच एक विक्रम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या वडिलांचा उपचारावेळी मृत्यू, हलगर्जीपणाचा आरोप करत रुग्णालयात तोडफोड

अखेर दिसला क्रांती रेडकरच्या मुलींचा चेहरा; सोहम- पूजाच्या लग्नात मागेपुढे करणाऱ्या छबील गोदोला पाहून नेटकरी म्हणतात-

ICC ODI Rankings: विराट कोहली, रोहित शर्मा यांची 'दबंग'गिरी; दोन दिग्गजांच्या निवृत्तीची वाट पाहणाऱ्यांना चपराक

Pregnancy With Diabetes: डायबिटीजमुळे प्रेग्नन्सीचं टेन्शन आहे? डायबेटिक महिलांसाठी डॉक्टरांनी दिला सोपा रोडमॅप

जेकेचा स्वॅग पाहिलात का? नॅशनल क्रश गिरिजा ओकसोबतच गाणं ऐकून नेटकरी फिदा, म्हणाले...'आम्ही सिंगलच मरणार...'

SCROLL FOR NEXT