Karnataka LokSabha Election Congress Operation Hasta DK Shivakumar esakal
देश

Loksabha Election : भाजपच्या 'ऑपरेशन लोटस'ला प्रत्युत्तर देण्यासाठी डीकेंनी आखली मोठी रणनीती; कर्नाटकात जोरदार हालचाली

'ऑपरेशन कमळ'च्या माध्यमातून भाजप कोणत्याही क्षणी काँग्रेस सरकारचा पाया हादरवण्याचा प्रयत्न करू शकतो.

सकाळ डिजिटल टीम

तपास यंत्रणांचा गैरवापर करून काँग्रेस आमदारांना अडकवण्याचं केंद्र सरकारचं कारस्थान सुरु असल्याची चर्चा आहे.

बंगळूर : काँग्रेसचे (Congress) पहिले प्राधान्य लोकसभा निवडणुकीला आहे. कर्नाटक प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांनी इतर पक्षांतील नेते आणि कार्यकर्त्यांशी वैर निर्माण न करता 'हात' मिळवणी करून मते वाढवण्यावर भर देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पत्रकारांशी बोलताना त्यांनी 'ऑपरेशन हस्त' बाबत (Operation Hasta) संकेत दिले. काँग्रेसचे पहिले प्राधान्य लोकसभा निवडणुकीला आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांना बदल करावे लागतील. स्थानिकांनी नाराजी बाळगू नये. याबाबत कार्यकर्त्यांना आणि स्थानिक नेत्यांना आधीच कळवले आहे.

अनेक ठिकाणी काँग्रेसचे अस्तित्व नाही. तेथे जुळवून घेऊन मते वाढवणे आवश्यक आहे. काँग्रेसवाल्यांनी या विषयावर नाराजी बाळगू नये. पक्षाचे हीत खूप महत्त्वाचे आहे. आम्हाला मोठे नेते नको आहेत. स्थानिक पातळीवर मताधिक्य वाढवणाऱ्या नेत्यांना प्राधान्य दिले जाईल. त्यासाठी स्थानिक पातळीवर समायोजन करावे, अशी सूचना त्यांनी केली.

भाजप आमदार संपर्कात

पक्षाची तत्त्वे विसरून सत्तेसाठी स्वार्थी राजकारण करणाऱ्यांना कोणत्याही कारणास्तव पक्षात घेऊ नये. यामुळे पक्षनिष्ठांचा अपमान होईल. भूतकाळात धजद-काँग्रेस आघाडी सरकारच्या पतनात महत्त्वाची भूमिका बजावणारे बंगळूरमधील १७ आमदारांपैकी तीन आणि किनारपट्टी भागातील एक आमदार काँग्रेस नेत्यांच्या सतत संपर्कात आहेत. शिवकुमार यांनीही याला दुजोरा दिला आहे.

'ऑपरेशन कमळ'चा धसका

याशिवाय 'ऑपरेशन कमळ'च्या (Operation Lotus) माध्यमातून भाजप कोणत्याही क्षणी काँग्रेस सरकारचा पाया हादरवण्याचा प्रयत्न करू शकतो, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. खबरदारी म्हणून भाजपचे डाव हाणून पाडण्यासाठी 'ऑपरेशन हस्त' हे अस्त्र चालवले जात असल्याची चर्चा आहे.

काँग्रेसमधील अस्वस्थ असलेल्यांना पाठिंबा देण्यासाठी भाजप वारंवार विधाने करत आहे. नुकतेच भाजपचे आमदार बसनगौडा पाटील- यत्नाळ यांनी काँग्रेसचे सरकार येत्या काही महिन्यांत पडणार असल्याचे म्हटले आहे.

स्वकियांचीच पक्षावर टीका

तपास यंत्रणांचा गैरवापर करून काँग्रेस आमदारांना अडकवण्याचं केंद्र सरकारचं कारस्थान सुरु असल्याची चर्चा आहे. त्याशिवाय काँग्रेसमधील बसवराज रायरेड्डी, बी. आर. पाटील, अजय सिंग आदी पक्षावर टीका करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पूरग्रस्तांसाठी ५ रुपये मागितले तर..., शेतकऱ्यांकडून वसुलीच्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीस कडाडले; कारखान्यांना इशारा

महावितरणचा दरवाढीचा शॉक! वीज होणार महाग, प्रति युनिट 'इतके' पैसे द्यावे लागणार जास्त

Kolhapur Accident : संतोष आणि मोहम्मद जिवलग मित्र पण नियतीच्या मनात वेगळ होतं..., दुचाकींच्या धडकेत दोघे मित्र ठार

Latest Marathi News Live Update: छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावर अर्धा तास रस्ता रोको आंदोलन

Bachchu Kadu : 'शेतकरी एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक'; बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

SCROLL FOR NEXT