sachin sawant 
देश

जमीन महाराष्ट्राचीच; कर्नाटक सीमावादात काँग्रेसची उडी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा वादात आता काँग्रेसनं उडी घेतली आहे. सीमा लढ्याबाबत आता महाराष्ट्रातील काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी थेट म्हटलं की, वादग्रस्त जमीन ही महाराष्ट्राची आहे आणि ही जमीन महाराष्ट्राला परत मिळायला हवी. कर्नाटक काँग्रेसच्या भूमिकेच्या अगदी उलट अशी महाराष्ट्र काँग्रेसची ही प्रतिक्रिया आहे. 

सचिन सावंत यांनी सांगितलं की, महाराष्ट्रातील लोकांसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद बऱ्याच काळापासून प्रलंबित आहे. वादात असलेला भाग म्हणजे बेळगाव, निपाणी, कारवार याठिकाणी मराठी लोक मोठ्या प्रमाणावर राहतात. यामुळे या भागावर महाराष्ट्राचा हक्क आहे. ही जमीन महाराष्ट्राच्या ताब्यात यायला हवी असंही त्यांनी स्पष्टपणे म्हटलं. 

कर्नाटक काँग्रेसच्या अगदी उलट भूमिका असल्याबाबत विचारले असता सचिन सावंत म्हणाले की, आम्ही महाराष्ट्राच्या जनतेचा विचार करतो. कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील सीमा वादाचा मुद्दा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ट्विटनंतर आला होता.

मुख्यमंत्र्यांच्या ट्विटनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही ट्विट केल्यानं जोरात चर्चा सुरू झाली. यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी उत्तर दिलं आहे. कर्नाटकने महाराष्ट्राला एक इंचही जमीन देण्याचा प्रश्न उरत नाही. फक्त राजकीय कारणांसाठी अशी वक्तव्य करणं थांबवा. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आनंदाची बातमी ! तुकडेबंदी व्यवहारांच्या नोंदीसाठी कार्यपद्धती निश्‍चित; उल्लंघन करून झालेले व्यवहार नियमित होणार !

Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकर ओपनिंगला आला... १२७च्या स्ट्राईक रेटने चोपल्या धावा; पण अभिनव तेजराणाची हवा...

संतोष जुवेकर लग्नबंधनात अडकणार? प्रेमाबद्दल बोलताना म्हणाला...'जिथं प्रेम तिथं अ‍ॅडजस्टमेंट...'

Latest Marathi News Live Update : कांदिवलीत मुख्यमंत्र्यांच्या ‘स्मरणशक्ती’साठी पंचामृत अभिषेक

Stock Market Today : शेअर बाजार पुन्हा तेजीत, MCX चा शेअर 10,000 रुपयांवर; जाणून घ्या कोणते शेअर्स वाढले

SCROLL FOR NEXT