Karnataka man kills delivery boy for Unable to pay for secondhand iPhone hides body for 4 days  
देश

Crime News : आयफोन घेऊन आले्ल्या डिलीव्हरी बॉयला संपवलं अन्…; कारण ऐकून व्हाल थक्क

सकाळ डिजिटल टीम

एका २० वर्ष वय असलेल्या तरुणाने आयफोनसाठी एका डिलीव्हरी बॉयची कथितरीत्या हत्या करून चार दिवस मृतदेह स्वतःच्या घरात ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या तरुणाने ऑनलाईन आयफोन ऑर्डर केला. यानंतर जेव्हा डिलीव्हरी एजंट हा ऑर्डर केलेला आयफोन देण्यासाठी घरी आला तेव्हा त्याने चक्क डिलीव्हरी एजंटचीच भोकसून हत्या केली. कर्नाटकातील हसन जिल्ह्यात हा हदरवून टाकणारा प्रकार घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ११ फेब्रुवारी रोजी अंचकोप्पल रेल्वे स्थानकाजवळ एक जळालेला मृतदेह आढळून आल्याने ही बाब उघडकीस आली, त्यानंतर तपास सुरू करण्यात आला.

तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की, हेमंत नाईक (२३) हा ई-कार्ट एक्स्प्रेसमध्ये काम करणारा तरुण ७ फेब्रुवारी रोजी लक्ष्मीपुरा ले-आऊटजवळ हेमंत दत्ता यांने बुक केलेला सेकंडहँड आयफोन देण्यासाठी गेला होता. डिलीव्हरी एजंटला देण्यासाठी पैसे नव्हते म्हणून त्याची कथितरीत्या हत्या केली. या प्रकारमुळे खळबळ उडाली आहे.

नाईक याने ऑर्डर डिलीव्हरीनंतर ४६ हजार रुपयांची मागणी केली असता हेमंतने वार करून त्याचा खून केला आणि मृतदेह चार दिवस स्वतःच्या घरीत ठेवला. नंतर तो मृतदेह पोत्यात भरून, दुचाकीवर नेऊन रेल्वे स्थानकाजवळ जाळून टाकला.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी मृतदेह जाळण्यासाठी दुचाकीवरून मृतदेह घेऊन जाताना दिसत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतदेह जाळून पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीने पेट्रोल देखील खरेदी केले होते. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज शोधून त्या व्यक्तीला अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime: नागपूर हादरलं! झुंड चित्रपटात भूमिका केलेल्या कलाकाराचा खून; पोलिस म्हणाले...

Latest Marathi News Live Update : नवी मुंबई विमानतळामुळे प्रवास सुखकर होणार- अजित पवार

NMIA: लोटस-इंस्पायर्ड डिझाईन, फ्युचरिस्टिक टेक अन्...; नवी मुंबई विमानतळ जागतिक पातळीवर चमकणार, कसं आहे नवं Airport?

Nashik News : नवीन नाशिकमध्ये 'एआय'चा धुमाकूळ! बिबट्याचे बनावट फोटो व्हायरल, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

PM Jeevan Suraksha : प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजनेचा एक रुपयाचा फायदा नाही अन् सर्व सामान्यांकडून २५ कोटीहून अधिक रक्कम वसूल

SCROLL FOR NEXT