Karnataka new CM Siddaramaiah esakal
देश

Karnataka चे नवे मुख्यमंत्री सिद्धरामय्या होणार 'बस कंडक्टर'; काय आहे कारण?

मुख्यमंत्री बीएमटीसी बसमधून प्रवास करतील आणि राज्याच्या राजधानीत प्रकल्पाच्या प्रारंभासाठी महिला प्रवाशांना मोफत तिकीट देतील.

सकाळ डिजिटल टीम

राज्य सरकार सत्तेवर आल्यानंतर महिन्याच्या आत सर्व हमी योजनांची अंमलबजावणी करत आहे, ही वस्तुस्थिती आहे.

बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) रविवारी (ता. ११) बस ‘कंडक्टर’ची भूमिका पार पाडतील आणि ‘शक्ती’ योजनेचा प्रारंभ करतील. महिलांना सरकारी बसमध्ये (Government Bus) मोफत प्रवास योजना सुरू होणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने (Congress) दिलेल्या पाच हमीपैकी ही योजना आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री बीएमटीसी बसमधून प्रवास करतील आणि राज्याच्या राजधानीत प्रकल्पाच्या प्रारंभासाठी महिला प्रवाशांना मोफत तिकीट देतील. तर मंत्री आणि आमदार आपापल्या जिल्ह्यांमध्ये आणि मतदारसंघातील ही योजना (Shakti Yojana) प्रारंभ करतील.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील निवेदनात म्हटले आहे की, सिद्धरामय्या यांनी आमदारांसह जिल्हा पालकमंत्र्यांना ‘शक्ती’ योजनेचे उद्‍घाटन करण्याचे आदेश बजावतील. सर्व जात, धर्म आणि वर्गाच्या पलीकडे जाऊन ही योजना सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल, याची खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत.

दरवाढ आणि महागाईमुळे अडचणीत सापडलेल्या महिलांना ‘शक्ती’मुळे दिलासा मिळाला आहे. राज्य सरकार सत्तेवर आल्यानंतर महिन्याच्या आत सर्व हमी योजनांची अंमलबजावणी करत आहे, ही वस्तुस्थिती असूनही त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी जमा करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: आनंदाची बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे दहा पदरी होणार; चार नव्या लेनसाठी राज्य सरकारचं नियोजन काय?

Stock Market Closing : बाजारातील तेजी सलग सहाव्या दिवशीही कायम; निफ्टीने ओलांडला 26000 चा टप्पा; कोणते शेअर्स फायद्यात?

Viral Video: शिल्पा शेट्टीची 'बिबट्या साडी' पाहिलीत का? लाल साडीत हॉट अंदाज, अन् पदरावर भला मोठा बिबट्या

Latest Marathi Breaking News:अमित ठाकरे यांची त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यावर पहिली प्रतिक्रिया

Mumbai News: जिथं भविष्याची स्वप्नं पाहिली त्याच शाळेने माझ्या मुलीचा जीव घेतला, चिमुकलीच्या आईचा मन हेलावणारा टाहो!

SCROLL FOR NEXT