Karnataka Video Viral esakal
देश

Viral Video: वडिलांचे कर्ज माफ करण्यासाठी मुलाला करायला लावली 'नग्नपूजा'

कर्नाटकमध्ये एक भयानक घटना घडली आहे. ती घटना जेव्हा सोशल मीडियावरुन व्हायरल झाली तेव्हा मात्र त्याचे मोठे पडसाद उमटले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Viral Video: कर्नाटकमध्ये एक भयानक घटना घडली आहे. ती घटना जेव्हा सोशल मीडियावरुन व्हायरल झाली तेव्हा मात्र त्याचे मोठे पडसाद उमटले आहेत. कर्नाटकमध्ये पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. त्यानं दिलेल्या फिर्यादीनुसार तीन लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्या तीन जणांना अटकही करण्यात आली आहे. वडिलांचे कर्ज माफ व्हावे म्हणून त्या मुलाला तीन जणांनी पूजा करण्यास भाग पाडल्याचे दिसून आले आहे. Karnataka Police Filed fir naked worship boy viral video social

कर्नाटकमधील हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे. आपण अजुनही कोणत्या काळात राहतो आहोत, जगतो आहोत आणि कोणत्या अमानुष पद्धतींना बळी पडतो आहोत असा प्रश्न नेटकऱ्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. कित्येकांनी या गोष्टीवरुन त्या आरोपींवर सक्त कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. आरोपींनी संबंधित घटनेचा व्हिडिओ तयार करुन तो सोशल मीडियावर व्हायरलही केला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीनही आरोपींनी फिर्यादीला वचन दिले होते की, अशाप्रकारे नग्नपूजा केल्यानं त्याच्या वडिलांचे कर्ज माफ होईल. जर तुला तुझ्या वडिलांचे कर्ज फेडायचे असेल तर मग नग्न होऊन पूजा करावी लागेल. आरोपींना कर्जमुक्त करण्याचे आश्वासन दिल्यानंतर फिर्यादीनं नग्न होत पूजा केली. यावेळी आरोपींनी त्याचा व्हिडिओ तयार करुन तो सोशल मीडियावर शेयरही केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आरोपींना त्या मुलाची आर्थिक परिस्थिती माहिती होती. त्यामुळे त्यांनी त्याला त्याप्रकारे पूजा करण्यास भाग पाडले. फिर्यादीच्या वडिलांनी कोप्पल जिल्ह्यातील एका गावामध्ये घर तयार करण्यासाठी कर्ज घेतले होते. मात्र त्यांनी ते कर्ज वेळेत न फेडल्यानं त्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं आहे. त्या कुटूंबातील इतर सदस्यांनी मोलमजूरी करुन ते कर्ज फेडण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी कर्जदारांना मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: नोटिसा अन् चौकशा सुरू... आता मनोज जरांगे काय करणार? मुंबईबाबत घेतला मोठा निर्णय, बावनकुळेंना नेमकं काय म्हणाले?

गणरायाच्या आगमनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला! कोकणात जाताना कारचा अपघात; एकाचा मृत्यू, 4 जण जखमी

Ganesh Chaturthi Do's & Don'ts: गणपती बाप्पांना घरी आणताय? मूर्ती निवडण्यापासून स्थापनेपर्यंत ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा!

Marathi News Live Updates : तिसऱ्या दिवशीही वाहतूक कोंडीचा फटका; माणगाव-इंदापूर परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा

Mumbai News: गणेशोत्सवाची आठवडाभर सुट्टी; मात्र गुजराती, कॉन्व्हेंट शाळांचा सुट्टी देण्यास नकार, शिक्षण विभागाचे कारवाईचे संकेत

SCROLL FOR NEXT