Randeep Surjewala esakal
देश

Karnataka Politics : काँग्रेस हायकमांडनं 'हा' विषय घेतला गांभीर्यानं, सुरजेवालांनी थेट आमदार, मंत्र्यांनाच धरलं धारेवर

पक्षशिस्तीचे उल्लंघन करणारी वक्तव्ये करू नयेत.

सकाळ डिजिटल टीम

कर्नाटकात काँग्रेस २० हून अधिक लोकसभेच्या जागा जिंकेल.

बंगळूर : काँग्रेस आमदार (Congress MLA) आणि मंत्र्यांची वेगवेगळी वक्तव्ये वाढत असल्याने कॉंग्रेस हायकमांडने हा विषय गांभिर्याने घेतला आहे. पक्षाची चौकट ओलांडल्यास किंवा शिस्तीचे उल्लंघन केल्यास तसे पक्षाच्या अंतर्गत समस्यांवर जाहीर वक्तव्य केल्यास योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा हायकमांडने बुधवारी दिला.

केपीसीसी कार्यालयात आज झालेल्या तातडीच्या बैठकीनंतर बोलताना प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला (Randeep Singh Surjewala) म्हणाले की, आमदार आणि मंत्र्यांनी त्यांचे विभाग, मतदारसंघ आणि विकासकामांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. पक्षशिस्तीचे उल्लंघन करणारी वक्तव्ये करू नयेत. मंत्री आणि आमदारांनी पक्षाच्या चौकटीबाहेर बोलू नये. मुख्यमंत्री बदलाबाबत ते कोणतेही वक्तव्य करणार नाहीत.’’

आजच्या बैठकीत निगम व महामंडळांच्या नियुक्तीबाबतही चर्चा झाली. मध्यप्रदेश निवडणुकीनंतर आपण यावर पुन्हा चर्चा करू. आगामी लोकसभा निवडणुकीबाबतही चर्चा झाली. कर्नाटकात काँग्रेस २० हून अधिक लोकसभेच्या जागा जिंकेल. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार या दोघांनीही याबाबत आश्वासन दिले आहे. १५ दिवसांत संभाव्य उमेदवारांची यादी तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baby Trafficking Case: चार वेळा विकलेले एक महिन्याचे बाळ तेलंगणमधून परत ताब्यात; संभाजीनगर पोलिसांनी बाळ विक्री रॅकेटचा पर्दाफाश

Uttarakhand: उत्तरकाशीत पावसाचे थैमान; ८० ट्रेकर्सची सुटका, उर्वरितांच्या बचावासाठी बचावासाठी ८ हेलिकॉप्टर्स मैदानात video viral

Marathi News Live Updates: दुष्काळाने ऊसही कडू केला; दिवाळी तोंडावर असताना महिला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, जनावरांच्या चाऱ्यासाठी उभा ऊस विकण्याची वेळ

Oppo K14 Plus 5G स्मार्टफोन लाँच; 144Hz AMOLED डिस्प्ले आणि 45W फास्ट चार्जिंगचा धुमाकूळ! पहा किंमत...

Childhood Cancer Symptoms : मुलाला येणारा ताप केवळ सामान्य ताप नसू शकतो; पालकांनी 'या' धोक्याच्या घंटा कधी ओळखाव्या? तज्ज्ञांनी दिला गंभीर आजाराचा इशारा

SCROLL FOR NEXT