Siddaramaiah vs Ramesh Jarkiholi esakal
देश

Karnataka Politics : कर्नाटकातील काँग्रेस सरकार कोसळणार? मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, पाच वर्षे मीच..

आमचा पक्ष पूर्ण पाच वर्षे सत्तेत असेल आणि पाचही वर्षे मीच मुख्यमंत्री असेन.

सकाळ डिजिटल टीम

'काम नसलेले आमदार मुख्यमंत्री बदलण्याची चर्चा करतात. त्यांना करण्यासारखे दुसरे काही नाही.'

बंगळूर : आमचा पक्ष पूर्ण पाच वर्षे सत्तेत असेल आणि पाचही वर्षे मीच मुख्यमंत्री असेन. तसेच पुढील निवडणुकीतही काँग्रेस (Congress Government) पुन्हा सत्तेवर असेल, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) म्हणाले. अलिकडेच काँग्रेसच्या एका गटाकडून अडीच वर्षांनंतर राज्याचा मुख्यमंत्री बदलणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ‘आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत. जो काही निर्णय होईल, त्यावर हायकमांडशी चर्चा झाली पाहिजे.’ उपमुख्यमंत्रिपदाचा निर्णयही हायकमांडचाच आहे. काम नसलेले आमदार मुख्यमंत्री बदलण्याची चर्चा करतात. त्यांना करण्यासारखे दुसरे काही नाही. ते असेच बोलतात.

पाचही वर्षे मीच मुख्यमंत्री असेन. रमेश जारकीहोळी (Ramesh Jarkiholi) यांच्या सरकार पडणार असल्याच्या वक्तव्याचा संदर्भ देत ते म्हणाले, ‘त्यांचा पराभव झाला आहे, त्यांना दुसरे काही काम नाही, त्यामुळे ते बोलत आहेत. राज्यातील जनतेने आम्हाला १३६ जागा दिल्या आणि विजयी केले. आम्ही पाच वर्षे सुरक्षित सरकार देऊ. भाजपचा भ्रमनिरास झाला आहे. ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. ते पुन्हा ऑपरेशन करण्याचा प्रयत्न करतील. ते शक्य नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दुष्काळ निवारणात सापत्नभाव

केंद्र सरकार दुष्काळ निवारणाच्या बाबतीत सापत्न वृत्तीने वागवत आहे. आमच्या मंत्रिमंडळातील चार मंत्री दिल्लीला गेले असतानाही पंतप्रधान आणि संबंधित मंत्री भेटीसाठी वेळ देत नाहीत. भाजप नेत्यांनी दुष्काळाचा अभ्यास थांबवून मदतकार्य करावे. राज्यात भाजपचे २५ खासदार आहेत. ते सर्व काय करत आहेत? असा सवाल त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Petrol Pump: पुण्यात सातनंतर पेट्रोलपंप सुरु राहणार का? संध्याकाळी काय निघाला तोडगा?

Pachod Crime : पाच लाखासाठी मुकादमाकडून ऊसतोड कामगाराचे अपहरण; पाचोड येथे गुन्हा

Pregnant Woman and Traffic Police Viral Video : भररस्त्यात प्रेग्नंट महिला ओरडत होती, पण तरीही वाहतूक पोलिस स्कूटी चालवतच राहिला, नक्की काय घडलं?

Viral Video Tractor : नाद केला पण वाया नाही गेला, ट्रॅक्टरवाल्या भावाने स्पिकरवर फॉरेनर नाचवल्या; 'चुनरी चुनरी' चा इन्स्टावर व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi Breaking News Live Update: म्हाडाचे भाडेतत्त्वावरील घरे धोरण मसुदा तयार

SCROLL FOR NEXT