Prajwal Revanna Esakal
देश

Prajwal Revanna: 'मी 31 मे रोजी SIT समोर हजर होणार', सेक्स स्कँडलमध्ये अडकलेल्या प्रज्वल रेवण्णाने दिली पहिली प्रतिक्रिया

Prajwal Revanna: लैंगिक शोषणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रज्वल रेवण्णा फरार झाला आहे. आता प्रज्वलने आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, परदेशात माझ्या ठावठिकाणाबाबत योग्य माहिती न दिल्याबद्दल मी माझे कुटुंबीय, माझे कुमारअण्णा आणि पक्ष कार्यकर्त्यांची माफी मागू इच्छितो.

अंकिता खाणे (Ankita Khane)

कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी प्रज्वल रेवण्णा 31 मे रोजी एसआयटीसमोर हजर होणार असल्याची माहिती आहे. सेक्स स्कँडल प्रकरण उघडकीस आल्यापासून प्रज्वल रेवण्णा फरार आहे. प्रकरण तापल्यानंतर तो परदेशात पळून गेल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. प्रज्वल रेवण्णा याने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 'माझ्याविरोधात राजकीय षडयंत्र रचले गेले. मी डिप्रेशन मध्ये गेलो. माझ्या विरोधात काही शक्ती कार्यरत आहेत कारण मी राजकीयदृष्ट्या पुढे जात आहे. 31 रोजी सकाळी 10 वाजता एसआयटीसमोर उपस्थित राहून सहकार्य करणार आहे. माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, माझ्यावर खोटे खटले आहेत, माझा कायद्यावर विश्वास आहे, असंही त्याने म्हटलं आहे.

प्रज्वल रेवण्णा पुढे म्हणाला की, मी परदेशात माझ्या ठावठिकाणाबाबत योग्य माहिती न दिल्याबद्दल माझे कुटुंबीय, माझे कुमारअण्णा आणि पक्ष कार्यकर्त्यांची माफी मागू इच्छितो.

'मी एसआयटीला पत्र लिहिले...'

प्रज्वल पुढे म्हणाला की, २६ तारखेला निवडणूक संपली तेव्हा माझ्यावर एकही गुन्हा दाखल नव्हता. एसआयटी स्थापन झाली नाही. मी गेल्यानंतर 2-3 दिवसांनी मी यूट्यूबवर माझ्यावरील हे आरोप पाहिले. मी माझ्या वकिलामार्फत एसआयटीला पत्र लिहून ७ दिवसांचा वेळ मागितला आहे.

मुख्यमंत्र्यांनी रेवण्णांचा पासपोर्ट रद्द करण्याची केली होती मागणी

अलीकडेच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी प्रज्वल रेवण्णा याचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द करण्याची मागणी केली होती. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. आपल्या पत्रात सिद्धरामय्या यांनी हे "लज्जास्पद" असल्याचे म्हटले आहे. रेवण्णावरील आरोप समोर आल्यानंतर आणि त्याच्यावर पहिला गुन्हेगारी खटला दाखल होण्यापूर्वीच देश सोडण्यासाठी आपला राजनैतिक पासपोर्ट वापरला होता.

या प्रवासाला मंत्रालयाची मान्यता नव्हती

प्रज्वल रेवण्णा यानी परराष्ट्र मंत्रालयाची परवानगी न घेता डिप्लोमॅटिक पासपोर्टवर प्रवास केला. नियमांनुसार, वैयक्तिक प्रवासासाठी देखील डिप्लोमॅटिक पासपोर्ट वापरण्यासाठी सूट आवश्यक आहे. 2 मे रोजी, साप्ताहिक ब्रीफिंग दरम्यान, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल म्हणाले, "खासदार प्रज्वल रेवण्णा याच्या जर्मनी भेटीबाबत परराष्ट्र मंत्रालयाकडून कोणतीही राजकीय मंजुरी मागितली गेली नाही किंवा जारी केली गेली नाही. अर्थात, व्हिसा नोट देखील नव्हती."

डिप्लोमॅटिक पासपोर्ट धारकांना जर्मनीला जाण्यासाठी व्हिसाची आवश्यकता असते. मंत्रालयाने इतर कोणत्याही देशासाठी व्हिसा नोट्स जारी केलेल्या नाहीत.

डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द झाल्यास काय होईल?

ज्याच्याकडे डिप्लोमॅटिक पासपोर्ट आहे त्याला अनेक विशेषाधिकार मिळतात. अशा लोकांना अटक किंवा परदेशात ताब्यात ठेवता येत नाही. एवढेच नाही तर डिप्लोमॅटिक पासपोर्ट धारकांना कोणत्याही देशात जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही. प्रज्वलचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द झाल्यास त्याला भारतात येण्यास भाग पाडले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT