Karni Sena President Sukhdev Singh Gogamedi shot dead in Jaipur Marathi News  
देश

Karni Sena President Death : राजपूत करणी सेना अध्यक्षाची गोळ्या झाडून हत्या; लाँरेन्स बिश्नोई गँगने दिली होती धमकी

रोहित कणसे

राजस्थानमधील जयपूरमध्ये श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंग गोगामेडी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोरांनी सुखदेव सिंह यांच्या गनरवर देखील गोळ्या झाडल्या. यानंतर, दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे सुखदेव सिंग गोगामेडी यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान, घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले आहेत. जयपूर येथील श्याम नगर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

ही घटना जयपूरच्या श्याम नगर येथे घडली, मिळालेल्या माहितीनुसार सुखदेव सिंह गोगामेडी हे आपल्या घरात होते, तेव्हा अज्ञात हल्लेखोरांनी घरात घुसून गोळ्या झाडल्या. यावेळी अनेक राउंड्स फायर करण्यात आले, पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

लॉरेंस बिश्नोई गँगमधील संपत नेहरा याने सुखदेव सिंह यांना धमकी दिल्याची माहिती आहे. धमकी मिळाल्यानंतर सुखदेव सिंह यांनी जयपूर पोलिसांकडे एक तक्रार दिली होती, यानंतर सुखदेव सिंह यांची हत्या करण्यात आली आहे.

हल्लेखोर दोन स्कूटरवरून आले होते. त्यांची संख्या चार असल्याचे सांगण्यात येत आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुखदेव सिंह गोगामेडी हे मंगळवारी दुपारी 1.45 च्या सुमारास श्याम नगर जनपथवरील त्यांच्या घराबाहेर उभे होते. त्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. गोगामेडी यांना मेट्रो मास हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्याचवेळी मेट्रो मास हॉस्पिटलबाहेर करणी सेनेच्या कार्यकर्त्यांची गर्दी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : नसरापूर प्रकरणातील आरोपीवर सर्व सात गुन्हे सिद्ध झालेत- न्यायाधीश

Nasrapur Case Verdict : नसरापूर हत्याप्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेप? आज न्यायालयाचा अंतिम निकाल

Shaktipeeth Highway : अदानी-अंबानींसाठी सुपीक जमीन जाणार? 'शक्तिपीठ' महामार्गावरून सांगलीतील शेतकऱ्यांचा एल्गार, जिल्हा परिषदेवर वाढला दबाव

Sangli DCC Bank : नातेवाइकांना कोट्यवधींची कर्जमाफी? नाबार्डच्या तपासणीत मोठा खुलासा, सांगली जिल्हा बँक अडचणीत, आमदार पडळकरांचा संचालकांवर गंभीर आरोप

Wife Mental Harassment Case : घरात झाडू मारतो, भांडी घासतो, तरीही बायको मारहाण करते... तरुणाने व्हिडिओ शेअर करत संपवले जीवन

SCROLL FOR NEXT