karti chidambaram gets relief from arrest till may 30 in-ed case on visa scam  
देश

व्हिसा प्रकरणी कार्ती चिदंबरम यांना दिलासा, ३० मेपर्यंत टळली अटक

रोहित कणसे

चिनी व्हिसा घोटाळ्याप्रकरणी माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांचा मुलगा आणि काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांना सीबीआय मुख्यालयात चौकशीदरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने कथित चीनी व्हिसा घोटाळ्याप्रकरणी अटकेपासून 30 मे पर्यंत अंतरिम संरक्षण दिले आहे. म्हणजेच 30 मे पर्यंत त्याला अटक होणार नाही. हे प्रकरण ईडीने नोंदवले आहे. (karti chidambaram gets relief from arrest till may 30 in-ed case on visa scam rak94)

कार्ती चिदंबरम यांनी माध्यमांशी संवाद साधत आपल्यावरील आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, मी एकाही चिनी नागरिकाला व्हिसा मिळवून देण्यासाठी मदत केलेली नाही. याआधी त्यांना INX मीडिया प्रकरणात तुरुंगवास भोगावा लागला आहे.

दरम्यान, 2011 मध्ये 263 चिनी नागरिकांना व्हिसा बनवण्याशी संबंधित कथित भ्रष्टाचार प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) बुधवारी काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी यापूर्वी कार्ती आणि त्यांचे वडील माजी अर्थ आणि गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या निवासस्थानावर सीबीआयने छापे टाकले होते.

आरोप काय आहेत?

2011 मध्ये कार्तीचे वडील पी चिदंबरम केंद्रीय गृहमंत्री असताना पंजाबमध्ये कार्यरत असलेल्या चिनी कंपनीच्या लोकांना कथितरित्या बेकायदेशीरपणे व्हिसा देण्यात आल्याचा आरोप आहे. कार्तीचा जवळचा सहकारी भास्कर रमण याच्यामार्फत या प्रकरणात लाचेच्या रकमेची हेराफेरी करण्यात आली होती. चिनी कंपनीच्या लोकांनी रमणच्या माध्यमातून कार्तीशी संपर्क साधला होता. या प्रकरणी सीबीआयने रमण यांना अटक केली आहे. तो सीबीआय कोठडीत आहेत. कार्ती चिदंबरम यांनाही आज सीबीआयसमोर हजर व्हायचे होते, मात्र ते हजर झाले नाहीत.

सीबीआयच्या एफआयआरमध्ये काय?

व्हिसा घोटाळा प्रकरण वेदांत ग्रुप कंपनी तलवंडी साबो पॉवर लिमिटेड (टीएसपीएल) च्या उच्च अधिकाऱ्याने कार्ती आणि त्याचा जवळचा सहकारी एस भास्कररामन यांना लाच दिल्याच्या आरोपांशी संबंधित आहे. ही कंपनी पंजाबमध्ये वीज प्रकल्प उभारत होती. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, वीज प्रकल्प उभारण्याचे काम एका चिनी कंपनीकडून करण्यात येत असून हे काम वेळेच्या मागे पडले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Viral Video : सुनेची आईसोबत मिळून सासुला बेदम मारहाण; झिंज्या पकडल्या, उचलून आपटलं अन्... व्हिडिओ व्हायरल

CA Result Success Story: अभ्यासातील सातत्य, जिद्दीच्या बळावर साकारले स्वप्न; राजनवर कौतुकाचा वर्षाव; सीए परीक्षेत ६०० पैकी मिळविले ५१६ गुण

Oneplus Nord CE 5 : वनप्लस Nord CE 5 लवकरच होणार लॉन्च; 7100mAh दमदार बॅटरी, आकर्षक फीचर्स अन् किंमत फक्त..

SCROLL FOR NEXT