cm  sakal
देश

Kashmir Ganesh Festival : काश्‍मीरमधील गणेशभक्तीने मुख्यमंत्री भारावले

पुण्यातील ‘सरहद’ संस्थेच्या पुढाकाराने हा कार्यक्रम पार पडला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - काश्‍मीरमधील संवेदनशील भाग मानल्या जाणाऱ्या लाल चौक येथील पंचमुखी हनुमान मंदिरात गेल्या २४ वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. या मंदिरात बसविलेल्या गणपतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच दर्शन घेतले. तसेच येथील नागरिकांनी जपलेल्या परंपरेचे कौतुक करत संवेदनशील परिस्थितीत गणेशोत्सवानिमित्त अधोरेखित होणाऱ्या काश्मीरच्या सामाजिक व धार्मिक एकोप्याने ते भारावून गेले. पुण्यातील ‘सरहद’ संस्थेच्या पुढाकाराने हा कार्यक्रम पार पडला.

या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संजय नहार, वैभव वाघ, सचिन जामगे आदी उपस्थित होते. यावेळी शिंदे म्हणाले, ‘‘काश्मीरच्या लाल चौकात गणेशोत्सव साजरा होणं ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. काश्मीरमध्ये १०० हून अधिक मराठी कुटुंब वास्तव्यास आहेत. येथील गणेशोत्सवात मराठी कुटुंबीयांसोबतच काश्मिरी मुस्लीम, काश्मिरी पंडित, शीख, बंगाली हेही तितक्याच उत्साहानं सहभागी होतात. हा एकोपा, सलोखा आणि शांती काश्मीरसह संपूर्ण भारतात अखंड टिकून राहावी.’’

काश्मीरमधील लाल चौकातल्या गणेशोत्सवाने यंदा रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. गेल्या २४ वर्षांपासून पंचमुखी हनुमान मंदिरात गणपती बसविला जात असून मंदिरातल्‍या या उत्सवाला सार्वजनिक रूप प्राप्त झाल्याचं बघायला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2027 Trade: चेन्नई सुपर किंग्सने हार्दिक पांड्याला 'ठेंगा' दाखवला; SRH चे दोन तगडे खेळाडू आपल्या संघात घेतले, त्याबदल्यात कोणाला दिले?

आईने माझी ती डायरीचं जाळून टाकली... ख्रिश्चन मुलाशी लग्न करण्याला कीर्ती सुरेशच्या घरच्यांचा होता विरोध; म्हणाली-

Latest Marathi News Live Update : गोकुळच्या राजकारणात माजी सरन्यायाधीशांच्याही मताचा उल्लेख

लग्नानंतर ८ वर्षांनी झालेली मुलगी, आईने करिअरही सोडलं; ९ वर्षीय मुलीचा अचानक वर्गातच मृत्यू, VIDEO VIRAL

Pune-Kolhapur Highway Traffic Update : पुण्याहून पाच तासात कोल्हापूर! ट्रॅफिकचं टेन्शन घेऊ नका, हे नवे पर्यायी रस्ते चेक करा

SCROLL FOR NEXT