kashmir pandit muslim 
देश

हृदयाला स्पर्श करणारी घटना! काश्मिरी पंडिताच्या मृतदेहाला मुस्लीम शेजाऱ्यांनी दिला खांदा

सकाळ डिजिटल टीम

श्रीनगर -  हिमवृष्टीमुळे वाहतुक व्यवस्था ठप्प पडलेली असताना दवाखान्यात निधन झालेल्या एका काश्‍मीर पंडितांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी गावाकडे नेणे अशक्य झाले होते. अशावेळी शोपियॉंतील स्थानिक मुस्लिमांनी खांदा देत सुमारे आठ ते दहा किलोमीटर वाटचाल करत तो मृतदेह गावी पोचवल्याचा प्रकार नुकताच घडला.

काश्‍मीर पंडित भास्कर नाथ (वय ६०) यांच्यावर श्रीनगर येथे एसकेआयएमएस रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु मूत्रपिंड निकामी झाल्याने त्यांचे निधन झाले. त्यांचा मृतदेह शोपियॉं जिल्ह्यातील पारगोची गावात न्यायचा होता. त्यासाठी रुग्णवाहिका बोलविण्यात आली. मात्र बर्फ असल्याने शोपियॉंतून गावाकडे रुग्णवाहिका नेणे अशक्य झाले.

रुग्णवाहिका चालकाने शहरातील कुटुंबीयास फोन केला. त्यांनी स्थानिक मुस्लिमांना या प्रकाराची माहिती दिली. त्यानुसार काही जण रुग्णवाहिकेकडे आले आणि त्यांनी पंडितांचा मृतदेह खांद्यावर घेत पारगोची गावी नेला. हिमवृष्टीतही अंत्यसंस्कार करणे कठीण बाब होती. परंतु हिंदू पद्धतीनुसार स्थानिकांनी सोय करत भास्कर नाथ यांच्यावर अंत्यसंस्कार केले. त्यांच्या पश्‍चात मुलगा आणि दोन मुली आहे.

स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, या परिसरात मोजकीच काश्मीर पंडितांची घरे आहेत. इथले लोक एकमेकांसोबत एका कुटुंबासारखे राहतात आणि समाजाचा एक भाग आहेत. भास्कर यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे.

काश्मीरमध्ये सध्या बर्फवृष्टी सुरु आहे. या परिस्थितीत अनेक ठिकाणी अत्यावश्यक सेवांसाठी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शनिवारी आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये भारतीय लष्कराचे जवान एका  बाळाला जन्म दिलेल्या महिलेला स्ट्रेचरवरून नेत असताना दिसतं. बर्फवृष्टीमुळे वाहतूक व्यवस्था नसल्यानं महिलेला जवानांनी अॅम्ब्युलन्सपर्यंत पोहोचवलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT