एक फेब्रुवारीपासून पॅसेंजर, लोकलसह सर्व ट्रेन रुळावर? जाणून घ्या खरं काय

indian railway corona lockdown
indian railway corona lockdown

नवी दिल्ली - कोरोनामुळे जगभरात अनेक देशांनी लॉकडाऊन केलं होतं. आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर हळू हळू सर्व व्यवहार पुन्हा सुरु करण्यात आले. दरम्यान, अद्याप आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे आणि देशांतर्गत रेल्वे वाहतुक मात्र पूर्णपणे सुरू झालेली नाही.

भारतीय रेल्वे प्रवाशांच्या प्रतिसादानुसार काही मार्गांवरची सेवा सुरु करत आहे. दरम्यान, आता एक मेसेज व्हायरल होत आहे. यामध्ये एक फेब्रुवारीपासून देशात सर्व पॅसेंजर ट्रेन, लोकल ट्रेन आणि प्रवासी स्पेशल ट्रेन चालू करण्यात येतील असा दावा केला जात आहे. याबाबत सरकारच्या पीआयबी फॅक्ट चेकच्या टीमने खरं काय ते सांगितलं आहे.

पीआयबीने एक ट्विट करून हा व्हायरल मेसेज खोटा असल्याचं म्हटलं आहे. एका मॉर्फ केलेल्या फोटोमध्ये रेल्वे बोर्डाने एक फेब्रुवारीपासून सर्व ट्रेन सुरु करण्याची घोषणा केली आहे असं म्हटलं आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, पीआयबीने हे खोटं असल्याचं स्पष्ट केलं आहे. रेल्वे मंत्रालयाने अशा प्रकारचे कोणतीही घोषणा केलेली नाही.

पीआयबीने एक फेब्रुवारीपासून ट्रेन सुरू होतील या व्हायरल मेसेजबाबत सांगितलं की, फोटोत करण्यात येणारा दावा खोटा आहे. पीआयबीच्या फॅक्ट चेक टीमने याबाबत चौकशी केली आहे. रेल्वे मंत्रालयाने अशा प्रकारची कोणतीही घोषणा केलेली नाही आणि अद्याप निर्णयसुद्धा घेतलेला नाही.

सध्या सोशल मीडियावर अशा प्रकारचे अनेक मेसेज व्हायरल होत आहेत. यामध्ये वेगवेगळे दावे केले जातात. अनेकदा अशा मेसेजवर लोकांचा विश्वास बसतो. पीआयबी फॅक्ट चेक टीम असे मेसेज आढळल्यास त्याची सत्यता तपासून लोकांपर्यंत खरी माहिती पोहोचवत असते. रेल्वेची माजी सीईओ वीके यादव यांनी डिसेंबर 2020 मध्ये सांगितलं होतं की, ट्रेन पुन्हा पहिल्यासारख्या कधी सुरु होतील याचा निर्णय अजून झालेला नाही. रेल्वे मंत्रालय याचा निर्णय़ घेईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com