देश

हिंमत असेल तर समोर या! काश्मीरी पंडिताच्या मुलीचं दहशतवाद्यांना खुलं आव्हान

विनायक होगाडे

श्रीनगर : गेल्या मंगळवारी श्रीनगरमध्ये एक प्रमुख काश्मीरी पंडीत उद्योजक मखन लाल बिंद्रु यांची दहशतवाद्यांकडून हत्या करण्यात आली आहे. त्यांची मुलीने आज माध्यमांसमोर येत रोखठोक भूमिका मांडत दहशतवाद्यांना थेट आव्हान दिलं आहे. हिंमत असेल तर समोर या आणि माझ्याशी चर्चा करा, असं खुलं आव्हान तिने आपल्या वडिलांच्या मारेकऱ्यांना दिलं आहे. "मी एका काश्मीर पंडित हिंदूची मुलगी आहे. हिंमत असेल तर समोर या" असं श्रद्धा बिंद्रू म्हणत होती. पुढे ती म्हणाली की, तुम्ही तर फक्त त्यांचं शरीर उडवलं आहे. मात्र, त्यांच्या आत्म्याला तुम्ही धक्का लावू शकत नाही. हे खूनी लोक फक्त दगड मारु शकतात किंवा पाठीमागून हल्ला करु शकतात, समोर येण्याची त्यांच्यात हिंमत नाहीये.

जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर आणि बांदीपोरा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी मखन लाल बिंद्रू यांच्यासमवेत तिघांची गोळी झाडून हत्या केली. बिंद्रू यांना श्रीनगरमध्ये त्यांच्या दुकानात मारण्यात आलं. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी एक मखन लाल बिंदरू श्रीनगरमध्ये एक मेडिकल स्टोअर चालवतात.

तिने म्हटलं की, ते एक असे व्यक्ती होते ज्यांनी काश्मीर आणि काश्मीरियतची सेवा केली. त्यांचं शरीर आता निघून गेलं आहे मात्र त्यांची आत्मा अद्याप जिवंत आहे. गुन्हा करणाऱ्यांनी स्वत:साठी नर्काचे दरवाजे उघडले आहेत. तुम्ही एखाद्या व्यक्तीला मारु शकता, मात्र त्याच्या स्पिरीटला मारु शकत नाही. ज्यांनी माझ्या वडिलांवर गोळ्या झाडल्या आहेत, त्यांनी माझ्या समोर यावं. माझ्या वडिलांनी मला शिक्षण दिलं आहे तर तुम्हाला राजकारण्यांनी बंदुक आणि दगड दिले आहेत. तुम्ही बंदूक आणि दगड घेऊन लढत आहात हाच षंढपणा आहे. सगळे राजकारणी तुमचा वापर करत आहेत. जर हिंमत असेल तर माझ्या समोर या आणि माझ्याशी चर्चा करा. मग बघू तुमच्यात किती हिंमत आहे. तुम्ही केवळ दगड मारु शकता आणि मागून गोळ्या झाडू शकता.

आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर इतक्या धाडसाने ठामपणे मत मांडणारी श्रद्धा बिंदरु सध्या नेटकऱ्यांच्या कौतुकास पात्र ठरली आहे. दु:खाच्या काळात ती दाखवत असलेली हिंमत वाखाणण्याजोगी असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC चा मोठा प्लॅन! फ्लायओव्हरमुळे प्रवासात २५ मिनिटांची बचत होणार, कुठून कुठे बांधणार? जाणून घ्या मार्ग...

IPL 2026 : वैभव सूर्यवंशी बॅटमध्ये 'AI Chip' लावून खेळतोय! पाकड्यांच्या पोटात दुखतंय, उलटसुलट आरोप करत सुटलेत...

LPG Cylinder Rules 2026 : १ मे पासून एलपीजी गॅसचे नियम बदलणार, कधी बुक करता येईल सिलिंडर? महत्त्वाची अपडेट समोर

१३२ किलोवरून थेट ६५ किलोवर! फू बाई फू फेम आरती सोलंकीनं पाणी पुरी खाऊन बदलल्या 'या' सवयी

Latest Marathi News Live Update : कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या राज्यव्यापी संपात वणीतील विक्रेते सहभागी

SCROLL FOR NEXT