Ayodhya Ram Mandir Sakal Digital
देश

Ayodhya Ram Mandir : सोनिया गांधी, खरगे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार का? काँग्रेसने दिलं उत्तर

उत्तर प्रदेशमधील अयोध्येत 22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिरा प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उपस्थित राहण्यासाठी विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

रोहित कणसे

अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. कार्यक्रमाचे आयोजक श्रीराम जन्म तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या वतीने काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, मनमोहन सिंग, मल्लिकार्जुन खरगे, अधीर रंजन चौधरी आणि जेडीएसचे सर्वेसर्वा देवेगौडा यांनाही या सोहळ्याचे निमंत्रण पाठवण्यात आले आहे.

गुरुवारी काँग्रेस नेत्यांनी निमंत्रण मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र, पक्षाचे वरिष्ठ नेते २२ जानेवारीला अयोध्येच्या कार्यक्रमाला जाणार की नाही, हे काँग्रेसने अद्याप स्पष्ट केलेले नाही. परंतु पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी त्यांना निमंत्रण मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच श्रीराम जन्म तीर्थक्षेत्र ट्रस्टचे आभार मानले.

उत्तर प्रदेशमधील अयोध्येत 22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिरा प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उपस्थित राहण्यासाठी विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार यांनी सांगितले की, श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राने काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना उद्घाटनासाठी निमंत्रण पाठवले आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांचे वक्तव्य समोर आला आहे. काँग्रेस नेते या सोहळ्याला उपस्थित राहतील का, असे विचारले असता ते म्हणाले की, पक्षाच्या भूमिकेबद्दल लवकरच माहिती देण्यात येईल. 22 जानेवारीला या कार्यक्रमात सहभागी होण्याबद्दल देखील कळेल. हो, त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं आहे. आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खरगे, सोनिया गांधी आणि अधीर रंजन यांना वैयक्तिकरित्या निमंत्रण दिले आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि एचडी देवेगौडा यांनाही या सोहळ्याचे निमंत्रण पाठवण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत इतर विरोधी पक्षनेत्यांनाही निमंत्रण पाठवले जाण्याची शक्यता आहे. विविध परंपरेतील पूज्य संतांबरोबरच प्रत्येक क्षेत्रात योगदान देणाऱ्या सर्व मान्यवरांनाही निमंत्रण पाठविण्यात आल्याचे ट्रस्टने म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. प्राणप्रतिष्ठा पूजा 16 जानेवारी 2024 पासून सुरू होणार असून 22 जानेवारीला संपणार आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे कार्यक्रम आठवडाभर चालणार आहेत. 17 जानेवारी रोजी विविध मिरवणूका काढण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT