Arvind Kejriwal Manish Sisodia esakal
देश

'काश्मिरी पंडितांच्या दुकानांना केजरीवाल सरकार देणार मोफत वीज कनेक्शन'

सकाळ डिजिटल टीम

आम आदमी पक्षाच्या सरकारनं काश्मिरी पंडितांबाबत मोठी घोषणा केलीय.

दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi Party) सरकारनं काश्मिरी पंडितांबाबत (Kashmiri Pandit) मोठी घोषणा केलीय. केजरीवाल सरकारनं (Kejriwal Government) म्हटलंय की, INA मार्केट येथील विस्थापित काश्मिरी पंडितांच्या दुकानांमध्ये मोफत वीज जोडणी उपलब्ध करून दिली जाईल. या संदर्भात उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी मंगळवारी बीएसईएस (BSES) आणि पीडब्ल्यूडीसह (PWD) संबंधित विभागांच्या उच्च अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

मार्केटमध्ये पॉवर ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी निवडलेल्या जागेची तात्काळ पाहणी करण्याचे निर्देश सिसोदिया यांनी अधिकाऱ्यांना दिले. यासोबतच एका महिन्याच्या आत सर्व काश्मिरी पंडितांच्या दुकानात मोफत वीज जोडणी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दिल्ली जल मंडळाचे उपाध्यक्ष आणि ग्रेटर कैलाशचे आमदार सौरभ भारद्वाज हेही या बैठकीला उपस्थित होते.

अलीकडेच काश्मिरी पंडितांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची भेट घेऊन वीज कनेक्शनची समस्या सांगितल्याची माहिती आहे. काश्मिरी पंडितांनी सांगितलं की, त्यांची INA मार्केटमध्ये 100 हून अधिक दुकानं आहेत, जी विविध बांधकामांमुळं वर्षानुवर्षे स्थलांतरित करावी लागली. सध्या या दुकानांमध्ये विजेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना नसल्यानं दुकानदारांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. या प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तातडीनं कारवाई करण्याचे निर्देश विभागाला दिले.

उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया पुढं म्हणाले, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकार नेहमीच काश्मिरी पंडितांच्या हितासाठी उभं आहे. काश्मिरी पंडितांवर राजकारण करण्याऐवजी त्यांच्या प्रगतीसाठी आणि उन्नतीसाठी आम्ही नेहमीच काम केलंय. काश्मिरी पंडितांच्या या समस्येची तातडीनं दखल घेण्यात आलीय. दिल्ली सरकारनं त्यांच्या INA दुकानांमध्ये वीज जोडणी लावण्याचे काम सुरू केले असून 1 महिन्याच्या आत येथील वीज कनेक्शन बसविण्याचे काम पूर्ण होईल. दुकानदारांकडून कोणतंही शुल्क घेतलं जाणार नाही. त्याचा संपूर्ण खर्च दिल्ली सरकार उचलणार आहे, असं त्यांनी शेवटी नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! कोणते शेअर्स वाढले?

MPSC Success Story: वीटभट्टी कामगाराच्या मुलाची जिद्दीने यशाला गवसणी; एमपीएससी परीक्षेतून बनला कृषी उपसंचालक, आई-वडीलांनी उपाशी राहून दिलं शिक्षण!

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! पाठ्यपुस्तकांबरोबर आता दफ्तरही मिळणार मोफत; ४२ लाख विद्यार्थ्यांना होणार फायदा

Latest Marathi News Update: बिल गेट्स यांचे आंध्र प्रदेशातील गन्नवरम विमानतळावर आगमन

Kolhapur Crime : आठ दिवस भीतीत, सोने विकल्यानंतर बिनधास्त; अखेर पंचवीस दिवसांनी संशयित पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT