Arvind Kejriwal|Delhi Excise Scam Esakal
देश

Arvind Kejriwal: "केजरीवाल यांना तुरुंगात इन्शुलिन दिले जात नाही," आम आदमी पक्षाचा आरोप

Delhi Excise Scam: केजरीवाल यांना वीस वर्षांपासून मधुमेह आहे तर मागील 12 वर्षांपासून ते इन्शुलिन घेत आहेत. दररोज ते 50 युनिट इन्शुलिन घेतात.

सकाळ वृत्तसेवा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तुरुंगात हत्या करण्याचा कट रचण्यात आला असून, मधुमेह असूनही त्यांना इन्शुलिनचे इंजेक्शन दिले जात नसल्याचा आरोप आम आदमी पक्षाकडून रविवारी करण्यात आला.

मधुमेहावर उपचार करणारे डॉक्टर केजरीवाल यांच्यासाठी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणीही आप नेते सौरभ भारद्वाज पत्रकारांशी बोलताना केली.

तिहार तुरुंगात सामान्य आजारांवर उपचार करणारे डॉक्टर आहेत. तेथे मधुमेहावर उपचार करणारे डॉक्टर नसल्याचे तुरुंग प्रशासनाने एम्स रुग्णालयाला पाठवलेल्या पत्राद्वारे स्पष्ट झाले आहे, असे सांगून भारद्वाज म्हणाले की, दिल्लीच्या लोकांनी निवडून दिलेल्या मुख्यमंत्र्याला इन्शुलिनपासून वंचित ठेवले जात आहे.

केजरीवाल यांना वीस वर्षांपासून मधुमेह आहे तर मागील 12 वर्षांपासून ते इन्शुलिन घेत आहेत. दररोज ते 50 युनिट इन्शुलिन घेतात. सध्या त्यांना इन्शुलिनची गरज आहे, मात्र त्यांना ते दिले जात नाही.

विशेष म्हणजे आम आदमी पक्षाने केलेल्या आरोपांचे उपराज्यपाल कार्यालयाने खंडन केले आहे. अटक होण्याच्या काही दिवसकेजरीवाल यांनी इन्शुलिन घेणे बंद केले होते. ते मेटमार्फिन नावाच्या मधुमेह नियंत्रणात ठेवणाऱ्या गोळ्या घेत होते, असे उपराज्यपाल कार्यालयाकडून सांगण्यात आले.

दरम्यान शेकडो कोटींच्या फसवणुकीच्या आरोपाखाली दिल्लीच्या मंडोली तुरुंगात बंद असलेल्या सुकेश चंद्रशेखरने दिल्ली अबकारी घोटाळ्याच्या तपासात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासंदर्भात त्याने गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. त्यामुळे केजरीवाल यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आले.

दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना ईडीने अबकारी घोटाळ्याच्या प्रकरणात अटक केली आहे. केजरीवाल सध्या दिल्लीतील तुरुंगात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT