abhaya murder case
abhaya murder case 
देश

सुरुवातीला आत्महत्या भासवली, 28 वर्षांनी खूनाचा उलगडा; पादरी आणि नन दोषी

सकाळ डिजिटल टीम

तिरुवनंतपुरम - केरळमधील तिरुवनंतपुरम इथल्या सीबीआय न्यायालयाने मंगळवारी 28 वर्षे जुन्या सिस्टर अभया हत्या प्रकरणी दोन आरोपींना दोषी ठरवलं आहे. न्यायालयाने त्यांच्या निर्णयामध्ये केरळच्या कॉन्व्हेंटमधील सिस्टर अभयाच्या हत्या प्रकरणी एक पादरी आणि नन अशा दोघांना दोषी ठरवलं. कोट्टायामच्या एका कॉन्व्हेंटमध्ये 21 वप्षीय सिस्टर अभयाची 1992 मध्ये हत्या करण्यात आली होती. त्यानंतर गुन्हा लपवण्यासाठी तिचा मृतदेह कॉन्व्हेंट परिसरातील एका विहिरीत फेकण्यात आला होता. 

सीबीआय न्यायालयाने त्यांच्या निर्णय़ात सांगितलं की, फादर थॉमस कोट्टूर आणि सिस्टर सेफी यांच्या विरोधातील हत्येचे आरोप सिद्ध झाले आहेत. सध्या दोघेही न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. या प्रकरणी तिसऱा आरोपी फादर फूकराकयाल यास दोन वर्षांपूर्वी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आलं आहे. विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश जे सनल कुमार यांनी या प्रकरणी निकाल दिला. न्यायालय बुधवारी दोषींना शिक्षा सुनावणार आहे. 

थॉमस कोट्टूर कोट्टायममधील बीसीएम कॉलेजमध्ये सिस्टर अभयाला सायकॉलॉजी शिकवत होता. तत्कालीन बिशपचे सचिव म्हणूनही तो काम बघत होता. त्यानंतर कोट्टायमच्या Catholic Diocese चा चान्सलरसुद्धा बनला. तर सिस्टर सेफी त्याच्या हॉस्टेलमध्ये राहत होती जिथं सिस्टर अभया असायची. तिच्याकडे हॉस्टेलची जबाबदारी होती. दोघेही खून आणि गुन्हा लपवण्यासाठी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोषी आढळले. थॉमस कोट्टूरवर घरात ट्रेसपासिंग म्हणजेच परवानगीशिवाय घुसल्याचा आरोप होता.

सिस्टर अभयाला न्याय मिळवून देण्यासाठी लढाई लढत असलेल्या पॅनेलमधील एकच सदस्य जिवंत आहेत. मानवाधिकार कार्यकर्ते जोमोन पुथेनपुराकल यांनी निकालानंतर म्हटलं की, सिस्टर अभया प्रकरणात अखेर न्याय मिळाला. आता तिच्या आत्म्याला शांती मिळेल. या निकालाने उदाहरण समोर ठेवलं आहे की, जर तुमच्याकडे पैसा आणि ताकद असली तरी तुम्ही न्यायाशी खेळू शकत नाही. 

सीबीआयने सांगितलं होतं की, अभयाने 27 मार्च 1992 च्या पहाटे हॉस्टेलमध्ये कोट्टूर, फूतराकयाल आणि सेफी यांना आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं होतं. त्यानंतर आरोपींनी सिस्टर अभयाच्या डोक्यात धारधार वस्तूने वार केला होता. त्यानंतर गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला होता. या प्रकरणात सुरुवातीला पोलिस आणि गुन्हे अन्वेषण विभागाने आत्महत्या असल्याचं म्हटलं होतं. मात्र यावर काहींनी आक्षेप नोंदवला आणि याचिका दाखल केल्यानंतर सीबीआय़कडे तपास सोपवला होता. 

न्यायालयाने सीबीआयचे तीन अंतिम अहवाल फेटाळले होते. न्यायालयाने त्यांना आणखी खोलवर तपास करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाने अहवालात त्रुटी असल्याचं सांगितलं होतं. त्या दिवशी कुत्रे भुंकले होते की नव्हते. किचनचा दरवाजा बाहेरून बंद होता का? सिस्टर अभयाने विहिरीत उडी मारल्याचा आवाज इतर लोकांना कसा ऐकू आला नाही इत्यादी गोष्टींची तपशिलवार माहिती द्यावी असं न्यायालयाने म्हटलं होतं. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT