Pinarayi Vijayan vs Rahul Gandhi
Pinarayi Vijayan vs Rahul Gandhi esakal
देश

Pinarayi Vijayan : 'लोकांना वाटलं होतं राहुल गांधी देशाचे पंतप्रधान होतील; पण आता त्यांना कळून चुकलंय'

सकाळ डिजिटल टीम

'काँग्रेस केंद्रात बसलेल्या भाजपचा सामना करण्यास सक्षम नाहीय.'

काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांनी केरळमधील कन्याकुमारीतून 'भारत जोडो यात्रा' सुरू केली आणि सध्या काँग्रेस केरळमध्ये मुख्य विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. अशा परिस्थितीत केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन (Kerala CM Pinarayi Vijayan) यांनी राहुल गांधींवर निशाणा साधलाय.

पिनाराई म्हणाले, 'वायनाडच्या जनतेला वाटलं होतं की राहुल गांधी पंतप्रधान होतील; पण तसं झालं नाही. कारण, काँग्रेस केंद्रात बसलेल्या भाजपचा सामना करण्यास सक्षम नाहीय.' पिनाराई विजयन एका डाव्या नेत्याच्या शहीद दिनानिमित्त आयोजित सभेला पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार प्रहार केला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) काँग्रेसला 2019 च्या लोकसभा निवडणुकीत जितक्या जागा मिळाल्या, तितक्या जागाही आता मिळणार नाहीयत. कारण, केंद्रात बसलेल्या भाजपशी काँग्रेस स्पर्धा करू शकत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

राहुल गांधींची खिल्ली उडवत मुख्यमंत्री पिनाराई म्हणाले, "राहुल गांधी जेव्हा येथून (वायनाड, केरळ) निवडणूक लढले, तेव्हा लोकांना वाटलं होतं की ते देशाचे पंतप्रधान होतील; पण आता लोकांना कळून चुकलंय." या सभेत पिनाराईंनी केवळ काँग्रेसवरच टीका केली नाही तर, भाजप आणि आरएसएसवरही जोरदार हल्लाबोल केला. राहुल गांधी केरळमध्ये भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं जनसंपर्क वाढवत आहेत, त्यामुळं विजयन सरकारला चिंता सतावत आहे. यामुळंच राष्ट्रीय राजकारण हा मुद्दा बनवून ते राहुल गांधींवर निशाणा साधत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT