Rahul Gandhi esakal
देश

काँग्रेसमध्ये राहण्यात काहीच अर्थ नाही; केरळात बड्या नेत्याचा राजीनामा

Balkrishna Madhale

केवळ बहुसंख्यांकच नव्हे, तर अल्पसंख्यांकही काँग्रेस सोडत आहेत, त्यामुळे काँग्रेसमध्ये राहण्यात काहीच अर्थ नाही.

वायनाड : केरळच्या वायनाडमध्ये काँग्रेसला (Congress Party) आणखी एक धक्का बसला असून मंगळवारी माजी जिल्हा काँग्रेस कमिटीचे (डीसीसी) अध्यक्ष पीव्ही बालचंद्रन (P. V. Balachandran) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिलीय. देशातील भाजपाचा विकास रोखण्यात सर्वात जुना पक्ष अपयशी ठरल्याचा आरोप बालचंद्रन यांनी केलाय. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल (Rahul Gandhi) गांधी वायनाडमधून लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले आहेत. त्यामुळे बालचंद्रन यांचा राजीनामा हे पक्षाचे मोठे अपयश असल्याचे मानले जात आहे.

माजी आमदार के. सी. रोसाकुट्टी, केपीसीसी सचिव एमएस विश्वनाथन आणि डीसीसी सरचिटणीस अनिल कुमार यांनी या वर्षी एप्रिलमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी (Kerala Assembly Election) काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. आता बालचंद्रन यांच्या राजीनाम्यांनी केरळात काँग्रेसची पुरती वाताहत झालीय. तब्बल 52 वर्षे बालचंद्रन काँग्रेसमध्ये होते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी काँग्रेस पक्षाला मोठं यश मिळवून दिलंय.

P. V. Balachandran

पत्रकार परिषदेत बालचंद्रन यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय जाहीर केला. पत्रकार परिषदेत ते म्हणाले, दिशा गमावलेल्या पक्षासोबत लोक उभे राहणार नाहीत. काँग्रेसच्या राज्य नेतृत्वाच्या कार्यशैलीवरही त्यांनी टीका केली. लोकांना प्रभावित करणाऱ्या मुद्यांवर ते स्पष्ट राजकीय भूमिका घेण्यास सक्षम नसल्याचा आरोपही त्यांनी केलाय. केवळ बहुसंख्यांकच नव्हे, तर अल्पसंख्यांकही काँग्रेस सोडत आहेत, त्यामुळे काँग्रेस पक्षात राहण्यात काहीच अर्थ नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT