Snake Catcher Vava Suresh esakal
देश

50 हजारांहून अधिक साप पकडणाऱ्या सुरेशला नागाचा दंश

सकाळ डिजिटल टीम

याआधीही सुरेश यांना अनेकदा सापानं दंश केलाय; पण प्रत्येक वेळी त्यांनी मृत्यूला हरवलंय.

केरळमधील (Kerala) प्रसिद्ध सर्पमित्र वावा सुरेश (Vava Suresh) यांना कोट्टायम येथील कुरिचीजवळ नागानं (Cobra) दंश केलाय. केरळचे मंत्री व्ही. एन. वासवन (Minister VN Vasavan) यांनी सांगितलं की, सुरेश यांना तत्काळ कोट्टायम रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. सुरेश यांच्यासाठी सर्व वैद्यकीय सुविधांची व्यवस्था करण्यात आलीय. सुरेश हे प्रसिद्ध वन्यजीव संरक्षक आहेत. वावा सुरेश यांनी आतापर्यंत 50,000 हून अधिक साप पकडले आहेत.

याआधीही सुरेश यांना अनेकदा सापानं दंश केलाय. पण, प्रत्येक वेळी त्यांनी मृत्यूला हरवलंय. सुरेश यांना दोनदा व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आलंय. दक्षिण भारतातील सर्वात प्रसिद्ध स्नॅक कॅचर म्हणून सुरेश यांना ओळखलं जातं. केरळ हे विशेषत: सापांच्या 110 प्रजातींचं घर म्हणूनही ओळखलं जातं. सुरेश यांनी जवळपास सर्व प्रजातींचे साप पकडले आहेत. मानवी वस्तीतील सापांना वाचवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या केरळमधील सर्पमित्र वावा सुरेश यांना सोमवारी नागानं दंश केला. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. कोट्टायमच्या (Kottayam Kerala) कुरिचीमध्ये सुरेश कोब्रा पकडण्याचा प्रयत्न करत असताना, त्यांच्या उजव्या पायाला सापानं दंश केलाय. त्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं. तीन दिवसांपूर्वी लोकलमध्ये आलेल्या सापाला पकडण्यासाठी सुरेश यांना बोलावण्यात आलं होतं.

2020 मध्ये सुरेश केरळमधील पठानमथिट्टा येथे साप पकडण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, यावेळीही पिट व्हायपर सापानं त्यांना दंश केला होता. आतापर्यंत त्यांना 3500 हून अधिक सापांनी चावा घेतलाय. त्यापैकी 350 हून अधिक विषारी आणि धोकादायक स्वरूपाचे होते. WHO च्या मते, दरवर्षी सुमारे 2.8 दशलक्ष भारतीयांना साप चावतो. त्यामुळं 46,000 मृत्यू आणि 140,000 लोक अपंग झाले. सर्पदंश आणि मृत्यूची एकूण संख्या निश्चित करणं कठीण आहे. कारण, बहुतांश घटना ग्रामीण भागात घडतात आणि नोंदवल्या जात नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT