राज्यपाल आरिफ मोहंमद खान Sakal
देश

अभिभाषणावर सही करणार नाही; केरळमध्ये राज्यपालांची संघर्षाची भूमिका

याआधीही मुख्यमंत्री पी. विजयन आणि राज्यपाल खान यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले होते.

सकाळ वृत्तसेवा

कोची : केरळमध्येही मुख्यमंत्री विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष निर्माण झाला असून राज्यपाल आरिफ मोहंमद खान यांनी राज्य सरकारने तयार केलेल्या अभिभाषणावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे. उद्या (ता.१८) पासून विधिमंडळाच्या अधिवेशनाला राज्यपालांच्या अभिभाषणाने सुरूवात होणे अपेक्षित आहे, त्या पार्श्वभूमीवर ही वादाची ठिणगी पडली. याआधीही मुख्यमंत्री पी. विजयन आणि राज्यपाल खान यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले होते.

‘जन्मभूमी’ या दैनिकाचे माजी संपादक हरी. एस.करथा यांची राजभवनाचे अतिरिक्त खासगी सचिव म्हणून नियुक्ती करण्याच्या राज्यपालांच्या प्रस्तावाला राज्य सरकारने विरोध दर्शविला आहे. त्यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने पाठविण्यात आलेल्या फाईलवर सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवांनी प्रतिकूल शेरा मारल्याने राज्यपाल भडकले आहेत. हरी.एस.करथा हे सक्रिय राजकारणी असल्याने त्यांची या पदावर नियुक्ती करता येऊ शकत नाही, असे राज्य सरकारचे म्हणणे आहे.

करथा यांच्याकडे सध्या कोणत्याही राजकीय पक्षाचे पद नसल्याचे सांगत राज्यपालांनी त्यांच्या नियुक्तीची फाइल पुन्हा राज्य सरकारकडे पाठविली होती. राज्य सरकारने सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवांची उचलबांगडी केली असून के. आर. ज्योतिलाल यांच्याजागी शारदा मुरलीधरन (आयएएस) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कन्नूरच्या कुलगुरूंना मुदतवाढ देण्यावरूनही राज्यपाल आणि राज्य सरकारमध्ये मतभेद निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

निवृत्तिवेतनावरूनही वाद

केवळ दोन वर्षे सेवा बजावल्यानंतर मंत्र्यांच्या खासगी स्टाफमधील कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतन दिले जात असून हा जनतेच्या पैशांचा गैरवापर असल्याचा आरोप राज्यपालांनी जाहीर भाषणात केला होता. बरेचसे मंत्री हे दर दोन वर्षांनी अशाप्रकारच्या नियुक्त्या करत असल्याचे राज्यपालांनी म्हटले होते. राज्य सरकारने त्यांच्या या विधानाला आक्षेप घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dengue Cases: डेंग्यूने १२ वर्षीय सोहमचा बळी; वडील अन् बहीणही अतिदक्षता विभागात, सहा दिवस शीतगृहात ठेवावा लागला मृतदेह

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात पुण्याच्या मध्यवर्ती भागातील बारा प्रमुख रस्त्यांवर जड वाहनांना बंदी

BJP: भाजपमधून १३ पदाधिकाऱ्यांचे निलंबन अखेर मागे, पुन्हा पक्षकार्याची संधी

Mira Bhayandar Paryushan Controversy : भाजप आमदारांचा अजब फतवा! विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण नको, पर्यूषण पर्व काळात पालकांना शाळेचा मेसेज, राजकीय वाद पेटला

Indian Army Success Story: शेतकरी कुटुंबातील हर्षची भरारी! वयाच्या २४व्या वर्षी भारतीय सैन्यात लेफ्टनंट; आई गृहिणी, वडील शेतकरी, मुलाची प्रेरणादायी काहाणी

SCROLL FOR NEXT