Kerala High Court allows 15-year-old girl to terminate her 7-month pregnancy impregnated by her brother  
देश

High Court : भावाकडून १५ वर्षीय मुलगी सात महिन्यांची गर्भवती; हायकोर्टाने दिली मोठी परवानगी

रोहित कणसे

केरळ उच्च न्यायालयाने एका १५ वर्षीय मुलीला तिच्या सात महिन्यांच्या गर्भ मेडिकली टर्मिनेट करण्याची परवानगी दिली आहे. या मुलीला तिच्या भावाकडून गर्भधारणा झाली होती. य

या प्रकरणी शुक्रवारी न्यायमूर्ती झियाद रहमान एए यांनी मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी (MTP) ला परवानगी दिली. यासाठी कारण देताना, बाळाचा जन्म स्वतःच्या भाऊ-बहिणीतून झाला आहे, ज्यामुळे विविध सामाजिक आणि वैद्यकीय गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असते असे सांगण्यात आले आहे.

मुलीच्या वडिलांनी गर्भपाताची परवानगी मिळावी यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने हा आदेश दिला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एका मेडिकल बोर्डाने मुलीची तपासणी केली आणि ती एमटीपीसाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याचा रिपोर्ट दाखल केला आहे.

या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, ही गर्भावस्था अशीच सुरू राहिली तर ते त्या मुलीच्या सामाजिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी हानिकारक ठरण्याची शक्यता आहे.

रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, ही गर्भधारणा अशीच सुरू ठेवल्याने तिच्या सामाजिक आणि मानसिक आरोग्यास गंभीर इजा होण्याची शक्यता असते, तसेच किशोरवयीन गर्भधारणेच्या गुंतागुंतीमुळे तिच्या शारीरिक आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते.

या रिपोर्टमध्ये पुढे म्हटले आहे की, तिने गर्भधारणेचे ३२ आठवडे ओलांडले असल्याने, ती मुलगी वेळेच्या आधीच अनेक समस्यांसह मुलाला जन्म देण्याची शक्यता होती. याच रिपोर्टवर विचार करून न्यायालयाने म्हटले आहे की, अशा परिस्थितीत याचिकाकर्त्याने गर्भपातासाठी मागितलेली परवानगी अपरिहार्य आहे.

यानंतर न्यायालयाने मलप्पुरम जिल्हा वैद्यकीय अधिका-यांना आणखी उशीर न करता वैद्यकीयदृष्ट्या गर्भधारणा समाप्त करण्यासाठी लवकरात लवकर पावले उचलण्याचे निर्देश दिले. तसेच ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अहवाल सादर करावा, जेणेकरुन या प्रकरणातील संभाव्य समस्यांचे निराकरण करण्यासाठी न्यायालय योग्य आदेश देऊ शकेल असेही आदेशात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Audit For Shendapark Hospital : शेंडापार्कमधील शासकीय रुग्णालयाच्या बांधकामाचे होणार 'आयआयटी' ऑडिट! मंत्री हसन मुश्रीफांचा मोठा निर्णय, बिले रोखली

आशिकीनंतर पुन्हा प्रेमकथेत आदित्य रॉय कपूर! आदित्य रॉय कपूरच्या नव्या चित्रपटाची घोषणा; रोमान्स, अ‍ॅक्शन आणि संगीताचा तिहेरी धमाका

Latest Marathi News Update : पुण्यातील सदाशिव पेठेत मध्यरात्री दुकानाला आग

Monsoon Weakening India : देशाच्या ७० ते ८० टक्के भागांत पावसाचे ढग दिसेनात; माॅन्सून कुठे गायब झाला ? हवामान विभागाची मोठी माहिती

Solapur: मंगळवेढा वगळून नदीकाठी पाच तासाचा वीज पुरवठा जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाने शेतकऱ्यात संताप

SCROLL FOR NEXT