अकादमी ऑफ शरिया अँड अॅडव्हान्स्ड स्टडीज sakal
देश

केरळच्या 'या' इस्लामिक संस्थेत गीता-वेद-उपनिषदांचा केला जातो अभ्यास

वर्गात शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा संवादही संस्कृतमध्येच होतो

राहुल शेळके

त्रिशूर : मध्य केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील एका इस्लामिक शैक्षणिक संस्थेत विद्यार्थी संस्कृतमध्ये 'श्लोक' आणि 'मंत्र' पाठ करतात. वर्गात शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा संवादही संस्कृतमध्येच होतो. मलिक दीनार इस्लामिक कॉम्प्लेक्स (MIC) द्वारे संचालित अकादमी ऑफ शरिया अँड अॅडव्हान्स्ड स्टडीजचे (ASAS) प्राचार्य ओनमपिल्ली मुहम्मद फैझी म्हणतात की, संस्कृत, उपनिषद, पुराण इत्यादी शिकवण्याचा उद्देश इतर धर्मांबद्दल विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान आणि जागरूकता निर्माण करणे हा आहे.

हेही वाचा : गौतमी नाचली, तुमचं काय गेलं?

अकादमी ऑफ शरिया अँड अॅडव्हान्स्ड स्टडीजमध्ये विद्यार्थ्यांना संस्कृत शिकवण्यामागील आणखी एक आणि मुख्य कारण म्हणजे, फैजी यांची स्वतःची शैक्षणिक पार्श्वभूमी होती, कारण त्यांनी शंकर दर्शनाचा अभ्यास केला होता. त्यांनी पीटीआयला सांगितले की, विद्यार्थ्यांना इतर धर्म आणि त्यांच्या चालीरीती आणि परंपरांची माहिती असावी. पण आठ वर्षांच्या कालावधीत संस्कृतसह 'उपनिषद', 'शास्त्रे', 'वेदांतम्' यांचा अभ्यास करणे शक्य नाही. त्यामुळे याविषयी प्राथमिक माहिती देऊन इतर धर्मांबद्दल जागरुकता निर्माण करण्याचा विचार आहे.

फैजी म्हणाले की, इयत्ता 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर आठ वर्षांच्या कालावधीत विद्यार्थ्यांना भगवद्गीता, उपनिषद, महाभारत, रामायण यातील महत्त्वाचे आणि निवडक भाग संस्कृतमध्ये शिकवले जातात. संस्था ही मुख्यतः एक शरिया महाविद्यालय आहे. जे कालिकत विद्यापीठाशी संलग्न असल्यामुळे कला शाखेत तसेच उर्दू आणि इंग्रजी सारख्या इतर भाषांमध्ये पदवी अभ्यासक्रम येथे शिकवले जातात. शैक्षणिक अभ्यासक्रम जास्त असल्यामुळे आम्ही असे विद्यार्थी घेतो जे अभ्यासक्रम नीट अभ्यासू शकतील. विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते.

प्राचार्य फैजी म्हणाले, विद्यार्थ्यांच्या पालकांचा किंवा इतर कोणाचाही आक्षेप नसला तरी विद्यार्थ्यांना संस्कृत, भगवद्गीता, उपनिषद इत्यादी योग्य पद्धतीने शिकवण्यासाठी चांगले गुरू शोधणे हे मोठे आव्हान आहे. त्यामुळेच आम्ही सात वर्षांपूर्वी संस्कृत शिकवू शकलो आणि म्हणूनच आमच्या सात शाखांपैकी फक्त हीच शाखा संस्कृत शिकवत आहे. ते म्हणाले की, आमच्याकडे एक उत्कृष्ट प्राध्यापक आहे, ज्यांनी विद्यार्थ्यांसाठी चांगला अभ्यासक्रम तयार केला आहे. विद्यार्थ्यांनी संस्कृत शिकण्यात रस दाखविल्याने त्यांना चांगला प्रतिसाद प्रतिसाद मिळाल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT