Kerala Veterinary University in Wayanad Student Ends Life Esakal
देश

Kerala Student: ते 29 तास... एवढा अत्याचार ज्यामुळे तरुणाला उचलावे लागले टोकाचे पाऊल

Wayanad: "हे सर्व सहन केल्यानंतर त्याला वाटू लागले की आता तो या विद्यापीठात शिक्षण पूर्ण करू शकत नाही आणि आता आपल्या समोर कोणताही पर्याय शिल्लक नाही."

आशुतोष मसगौंडे

Kerala Crime News:

वायनाड येथील केरळा वेटरनरी विद्यापीठात 20 वर्षीय जेए सिद्धार्थ या विद्यार्थ्याचा 18 फेब्रुवारी रोजी मृतदेह आढळला होता. दरम्यान, याबाबत आता धक्कादायक माहिती समोर येत आहे.

या विद्यार्थ्याने रॅगिंगला वैतागून आपले जीवन संपवले होते. यामध्ये धक्कादायक गोष्ट अशी की, विद्यार्थ्याने हे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी त्याच्यावर सलग 29 तास रॅगिंग झाले होते. केरळ पोलिसांनी नुकतीच याप्रकरणाची फाइल सीबीआयच्या हवाली केली, त्यामध्ये ही माहिती समोर आली आहे.

सीबीआयने नुकताच या प्रकरणाचा तपास हाती घेतला असून, या विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी पुन्हा एकदा 20 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

सीबीआयला पोलिसांनी पुरवलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थचा त्याच्या वर्गमित्रांनी आणि सिनिअर्सनी 16 फेब्रुवारीच्या सकाळी 9 पासून 17 फेब्रुवारीच्या दुपारी 2 वाजेपर्यंत मानसिक आणि शारीरिक छळ केला. तसेच त्याला पट्ट्यानं मारहाण केली, अशी माहिती पोलिसांकडून समोर आली आहे.

पोलिसांच्या तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ मानसिक तणावात गेला. त्याला वाटू लागले की आता तो या विद्यापीठात शिक्षण पूर्ण करू शकत नाही आणि आता आपल्या समोर कोणताही पर्याय शिल्लक नाही. त्यामुळे सिद्धार्थने टोकाचे पाऊल उचलत 18 फेब्रुवारी रोजी वसतिगृहाच्या बाथरूममध्ये गळफास घेत जीवन संपवले.

दरम्यान, 18 फेब्रुवारी रोजी सिद्धार्थ वसतिगृहाच्या परिसरात मृतावस्थेत आढळला.

ही घटना समोर आल्यानंतर, सिद्धार्थला झालेल्या मानसिक आणि शारीरिक त्रासामागे सत्ताधारी पक्ष सीपीआय(एम) ची विद्यार्थी शाखा स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाशी संबंधित विद्यार्थ्यांचा हात असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यानंतर केरळ पोलिसांनी कॉलेजमधील अनेक एसएफआय कार्यकर्त्यांना अटक केली.

सिद्धार्थच्या कुटुंबीयांनी सीबीआय चौकशीची मागणी केल्यानंतर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी हे प्रकरण सीबीआयकडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India suspends postal service to US: भारताने घेतला मोठा निर्णय! आता अमेरिकेसाठी ‘पोस्टल सर्विस’ बंद

National Space Day : भारताची भविष्यातली अंतराळ झेप कशी असेल? इस्रोच्या महत्वाकांक्षी मोहिमांची A टू Z माहिती, वाचा एका क्लिकवर

Latest Marathi News Updates : मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाच्या तयारीसाठी आज जालन्यात मराठा समाजाची महत्वाची बैठक

BEST Bus: गणेशोत्सवासाठी बेस्टची मोठी घोषणा, रात्री चालणार विशेष गाड्या; कधी आणि कुठे? जाणून घ्या

ODI World Cup 2027 साठी ठिकाणं ठरली! 'या' शहरांमध्ये खेळवले जाणार सामने

SCROLL FOR NEXT