KFF claims responsibility for killing bank employee KFF claims responsibility for killing bank employee
देश

केएफएफने स्वीकारली बँक कर्मचाऱ्याच्या हत्येची जबाबदारी; म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये गुरुवारी दहशतवाद्यांनी (Terrorist) बँक कर्मचाऱ्याची (bank employee) गोळ्या झाडून हत्या केली. काश्मीर फ्रीडम फायटर्स (KFF) या दहशतवादी संघटनेने याची जबाबदारी स्वीकारली आहे. एवढेच नाही तर केएफएफने एक पत्र जारी करून इशाराही दिला आहे. काश्मीरच्या लोकसंख्येच्या बदलात जो कोणी सहभागी असेल, त्याचे पण हेच हाल होईल, असे दहशतवादी संघटनेने म्हटले आहे. (KFF claims responsibility for killing bank employee)

काश्मीर फ्रीडम फायटर्स (KFF) या दहशतवादी (Terrorist) संघटनेने पत्र जारी करून म्हटले आहे की, कुलगाममधील आमच्या कॅडरने गुप्त माहितीच्या आधारे ऑपरेशन केले. यामध्ये बँक कर्मचारी (bank employee) विजय कुमार यांचा मृत्यू (killing) झाला. काश्मीरच्या लोकसंख्येच्या बदलात जो कोणी सामील असेल त्याचा परिणाम असाच होईल.

मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार त्यांना येथे कायमस्वरूपी ठेवेल या फसवणुकीत जगणाऱ्या बाहेरच्या लोकांसाठी हे डोळे उघडणारे आहे. यासाठी त्यांना आपला जीव गमवावा लागेल हे वास्तव आता बाहेरच्या लोकांनी समजून घेतले पाहिजे. विचार करा, अजून उशीर झालेला नाही. पुढचा नंबर तुमचा असू शकतो.

सध्या काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गुरुवारी दहशतवाद्यांनी कुलगाममधील मोहनपोरा येथील स्थानिक ग्रामीण बँकेत तैनात विजय कुमार यांची गोळ्या झाडून हत्या केली. याआधी मंगळवारी कुलगाममध्येच दहशतवाद्यांनी एका हिंदू शिक्षकाची गोळ्या झाडून हत्या केली होती. मे महिन्यात दहशतवाद्यांनी (Terrorist) काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांची बडगाम येथील कार्यालयात घुसून हत्या केली होती. राहुल भट्ट हे तहसीलमध्ये कार्यरत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IFFI 2026 : गोव्यातील ५७ व्या इफ्फी चित्रपट महोत्सवाची दिमाखात सांगता; पोर्तुगालच्या ॲक्वी चित्रपटाला सुवर्ण मयूर, ऋषभ शेट्टी ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेता

जन्मत:च राजासारखा थाट घेऊन येतात 'या' राशीचे लोक! सूर्यदेव देतात अफाट तेज अन् आत्मविश्वास

Zoho Share Dispute: घटस्फोटाचा वाद पोहोचला कंपनीच्या अब्जावधी डॉलरच्या मालकीहक्कापर्यंत; झोहोचे श्रीधर वेम्बू वादात; पत्नीचे गंभीर आरोप?

Raj Thackeray Dombivli : 'SIR प्रक्रियेवर लक्ष दिलं नाही तर जागा वाढवून काय फायदा?'; डोंबिवलीतून राज ठाकरेंचे मनसैनिकांना मोठे आदेश

Myanmar Airstrike: म्यानमारमध्ये लग्नसमारंभ सुरू असतानाच लष्कराचा बॉम्बहल्ला; पाच मुलांसह २१ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT