delhi violence
delhi violence  
देश

ट्रम्प यांच्या दौऱ्यावेळी ठरवून दिल्ली पेटवली; 930 पानी आरोपपत्रातील धक्कादायक माहिती

सकाळ ऑनलाईन टीम

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यादरम्यान दिल्लीतील दंगल घडवून आणली होती. यात जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिदचा हात होता, असे दिल्ली पोलिसांनी कोर्टात सांगितले आहे. फेब्रुवारीमध्ये दिल्लीमध्ये दंगल उसळली होती. यावेळी झालेल्या हिंसाचारात 53 जणांनी आपला जीव गमावला होता तर 200 हून अधिक नागरिक जखमी झाले होते.   

दिल्ली पोलिसांनी कोर्टात सादर केलेल्या आरोप पत्रात म्हटलय की, उमर  खालिदने अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दौरा लक्षात घेऊन दिल्लीमध्ये दंगल घडवून आणली. देशात अल्पसंख्यांकांवर अन्याय होत आहे, हा संदेश जगभरात पसरवण्याचा यामागे हेतू होता, असे दिल्ली पोलिसांनी कोर्टात सांगितले.   

पूर्वी दिल्लीतील कथित सांप्रदायिक हिंसाचाराच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी खालिद, शरजील आणि फैजान खान यांच्यावर आरोपपत्र दाखल केले आहे.  दिल्लीतील कडकडडूमा न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश अमिताभ रावत यांच्यासमोर दिल्ली पोलिसांनी 930 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.  आरोप पत्रानुसार, खालिद 23 फेब्रुवारीला दिल्लीहून पटनाला गेला आणि तो 27 फेब्रुवारीला दिल्लीत परतला. खालिदने अन्य संशयित आरोपिसोबत चांद बाग येथील कार्यालयात एक बैठक बोलावली होती. खालिद आणि अन्य दोन आरोपींनी दिल्लीतील हिंसाचार हा नियोजित कट रचून घडवून आणला, असे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे. 

पोलिसांनी कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, खालिदने दोन वेगवेगळ्या ठिकाणी चिथावणीखोर  भाषण दिले. एवढेच नाही तर भाषणावेळी खालिदने नागरिकांना ट्रम्प यांच्या दौऱ्यादरम्यान रस्त्यावर उतरुन आंदोलन करत अल्पसंख्यांकावर होणारा अत्याचाराला वाचा फोडण्याची भाषा केली होती. दंगल घडवून आणण्याच्या उद्देशाने अनेक घरात स्फोटकजन्य साहित्याचा साठा करुन ठेवण्यात आला होता, असा दावाही पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात खालिद आणि इमाम न्यायालयीन कोठडीत असून खानला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलाय.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

SCROLL FOR NEXT