Amritpal Singh
Amritpal Singh 
देश

Amritpal Singh: खलिस्तानी अमृतपाल सिंगचं पंजाब सरकारला आव्हान! म्हणाला, जर मला अटक...

सकाळ डिजिटल टीम

Amritpal Singh : पंजाब पोलिसांना गुंगारा देणारा मोस्ट वॉन्टेड खलिस्तानी अमृतपाल सिंग यानं आता थेट पंजाब सरकारलाच आव्हान दिलं आहे. सरकरला जर मला अटक करायची इच्छा असती तर त्यांनी पोलिसांना माझ्या घरी पाठवलं असतं, असं विधान अमृतपाल यानं केलं आहे. पीटीआयनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Khalistani Amritpal Singh challenge to Punjab Police)

पीटीआयच्या वृत्तानुसार, अमृतपाल सिंग म्हणतोय की, जर पंजाब सरकारला मला अटक करण्याची इच्छा असती तर सरकारनं पोलिसांना माझ्या घरी पाठवलं असतं मी त्यांना तिथेच भेटलो असतो.

फरार अमृतपाल सिंगच्या शोधासाठी महाराष्ट्र पोलीस अलर्ट मोडवर आहे. याबाबत नांदेड पोलिसांना सुरक्षा यंत्रणांच्या विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. नांदेडमध्ये येणाऱ्यांवर पोलिसांची कडक नजर असणार आहे. नांदेड शहरात पंजाबमधून येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यापूर्वी पंजाबमध्ये काही खलिस्तानी अतिरेकी पकडले गेले होते. अमृतपाल दुसऱ्या राज्यात जाऊ शकतो, त्यामुळं देशभरातील पोलीस देखील सतर्क झाले आहेत. 

हे ही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

पंजाब सरकारला कोर्टानं फटकारलं!

पंजाब पोलीस अमृतपालचा शोध घेत आहेत, मात्र तो वेशांतर करुन पोलिसांना चकवा देत आहे. हे प्रकरण आता पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयात पोहोचलं आहे. अमृतपाल पळून गेल्याबद्दल हायकोर्टानं पंजाब सरकारला फटकारलं असून आपल्याकडं ८० हजार पोलीस आहेत, तरीही तुम्ही त्याला अटक का करू शकत नाहीत? असा सवाल हायकोर्टानं केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Avinash Bhosale: पुण्यातील उद्योजक अविनाश भोसलेंना दिलासा! अखेर जामीन मंजूर

Gujarat News : 'तिला' डॉक्टर व्हायचं होतं, बोर्डाच्या परीक्षेत ९९ टक्के मिळाले; पण दुर्दैव...

EPFO Latest News : PF अकाउंटमधून तीन दिवसात मिळणार एक लाख रुपये, करा फक्त 'हे' काम

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 73,917 आणि निफ्टी 22,465 अंकांवर, कोणते शेअर्स वधारले?

Yed Lagla Premach: 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत 'या' अभिनेत्याची एन्ट्री; दिसणार इन्सपेक्टर जय घोरपडेच्या भूमिकेत

SCROLL FOR NEXT